MP Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Onion Price : दूध आणि कांदा दरवाढीसाठी खा. सुप्रिया सुळे रस्त्यावर; बारामतीत केलं आंदोलन

Milk Rate : राज्यातील कांदा आणि दूध दरवाढीसाठी बारामती येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता.७) आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार उपस्थित होते.

Dhananjay Sanap

Protest In Baramati : राज्यातील कांदा आणि दूध दरवाढीसाठी बारामती येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता.७) आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकरी चांगला दर मिळत नसल्याने मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. यावेळी दूध दर वाढ झालीच पाहिजे, कांदा दर वाढ झालीच पाहिजे, शेतकरी बचाव देश बचाव, अशी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारने दर द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे म्हणाल्या, "सरकार दूध अनुदान देतं. पण ते अनुदान शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. मिळालं तर तुटपुंज मिळतं. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रुपये प्रतिलिटरचा दर द्यावा." असंही सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी सरकार शेती प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उत्सुक नाही, त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली, असं म्हणत लाडकी बहिणीच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल केला.

केंद्र सरकारने कांद्यावर २० टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे. त्याचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. परिणामी निर्यात शुल्क हटवावं अशी शेतकरी मागणी करत आहेत. परंतु केंद्र सरकारने या मागणीकडे कानाडोळा केलेला आहे. तर दूध उत्पादकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली नाही. त्यामुळे दूध उत्पादक नाराज आहेत. परिणामी अनुदान नको, प्रतिलिटर ४० रुपये दर द्या, अशी मागणी केली जात आहे. याच मागण्या घेऊन आज बारामतीच्या तीन हत्ती चौकात खा. सुळे आणि युगेंद्र पवार यांनी आज सकाळी आंदोलन केलं. या आंदोलनात शेतकरी सहभागी होते.

संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात दौरा केला होता. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा आणि दूध दर प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन सुळे यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सुळे म्हणाल्या, "आम्ही हक्काचं मागत आहोत. आम्हाला फुकट नको. सरकार सत्तेत आलं त्यावेळी सोयाबीन, कापूस, कांदा, दूधाला दर देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करावं. आम्ही मुंबईत जाऊन निवेदन देऊ." असंही सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT