Smart Cotton Project Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Cotton Project : स्मार्ट प्रकल्पातील शेतकऱ्यांद्वारे कापसाचा जिनिंगला पुरवठा

Supply of Cotton : आत्मा प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी समुहाच्या वतीने या हंगामात उत्पादीत कापसाचा पुरवठा प्रक्रियेकामी जे. आर. कॉटन जिनिंग हिंगणघाटला करण्यात आला.

Team Agrowon

Vardha News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट कॉटन) आत्मा प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी समुहाच्या वतीने या हंगामात उत्पादीत कापसाचा पुरवठा प्रक्रियेकामी जे. आर. कॉटन जिनिंग हिंगणघाटला करण्यात आला.

हिंगणघाट तालुक्‍यात सुलतानपूर येथील शेतकरी गटातील समन्वयक प्रकाश भोयर यांच्या समन्वयाने भारत भोयर यांनी ६.९२, गणेश भोयर १९.९८, प्रकाश भोयर १७.७४ याप्रमाणे ४४.७४ क्‍विंटल कापूस संकलित करून त्याचा पुरवठा जिनिंगला करण्यात आला.

स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी गुलाब भदाणे व हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार, महाकॉटचे मार्केटिंग हेड चंद्रशेखर चवने, पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ बि.बि. बलगमवार, आर्थिक व वित्तीय सल्लागार एस. बी. ठाकरे यांची यावेळी उपस्थिती होती.

शेतकरी समूहाचे प्रकाश भोयर व रामचंद्र बोरकर यांचा जिनींग मालक राहुल वैद्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाचा वजनकाटा करुन जिनिंगमधील नियोजित ठिकाणी संकलित करण्यात आले.

मूल्यसाखळी तज्ज्ञ देवेंद्र देशमुख यांनी संकलित कापसाची आर्द्रता व इतर घटकांची तपासणी करून शेतकऱ्यांना पोहच पावती दिली. आत्मा यंत्रणेचे साहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद देवतळे, कॉटन ग्रेडर रवीस भांदिकर, एस.एन. काळपांडे, कापूस उत्पादक शेतकरी गटातील अनिकेत दिवे, सूरज चंदनकर, देवीदास भोयर यांची यावेळी उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT