Fertilizer Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Supply: हिंगोली जिल्ह्यात खरिपासाठी २० हजार टन खतांचा पुरवठा

Kharif Season 2025: हिंगोली जिल्ह्याला यंदाच्या (२०२५) खरीप हंगामासाठी ८९ हजार ६६९ टन खतांचा पुरवठा मंजूर झाला आहे.

Team Agrowon

Hingoli News: हिंगोली जिल्ह्याला यंदाच्या (२०२५) खरीप हंगामासाठी ८९ हजार ६६९ टन खतांचा पुरवठा मंजूर झाला आहे. खरिपासाठी १ एप्रिलपासून २० हजार ५५८ टन खतांचा पुरवठा झाला असून १५ हजार ७६२ टन खतांची विक्री झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाने खरीप हंगाम २०२५ साठी (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) हिंगोली जिल्ह्यासाठी ८२ हजार ३६३ टन खतांची मागणी केलेली असताना कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडची ८९ हजार ६६९ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. यंदाच्या मागणीच्या तुलनेत ७ हजार ३०६ टन जास्त तर २०२४ च्या खरिपातील ८५ हजार ४५१ टनांच्या तुलनेत ४ हजार २१८ टन एवढी जास्त खते मंजूर करण्यात आली आहेत.

या वर्षी जिल्ह्यात खरिपात ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्याचा सरासरी खतांचा वापर ८१ हजार ५६९ टन आहे. त्यानुसार ८२ हजार ३६३ टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. परंतु जिल्ह्याला विविध ग्रेडच्या ८९ हजार ६६९ टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

त्यात युरिया १९ हजार ८८५ टन, सुपर फॉस्फेट १७ हजार १०० टन, पोटॅश- एमओपी २ हजार ७२० टन, डीएपी १२ हजार ९६४ टन, संयुक्त खते-एनपीके ३७ हजार टन या खतांचा समावेश आहे. एप्रिलसाठी ६ हजार ३९३ टन, मेसाठी १० हजार ५५४ टन, जूनसाठी २१ हजार ९५९ टन,

जुलैसाठी १९ हजार ५७९ टन, ऑगस्टसाठी १७ हजार ३० टन, सप्टेंबरसाठी १४ हजार १५५ टन खत साठा मंजूर झाला आहे. जूनअखेरपर्यंत ३८ हजार ९०६ टन खते मंजूर आहेत. १ एप्रिलपासून आजवर २० हजार ५५८ टन खतांचा पुरवठा झाला आहे.

१५ हजार टन खतांची विक्री

३१ मार्चअखेर विविध ग्रेडची १८ हजार ३९ टन खते शिल्लक होती. यंदा खरिपासाठी झालेला पुरवठा मिळून एकूण ३८ हजार ५९८ टन खते उपलब्ध होती.त्यापैकी विविध ग्रेडच्या मिळून १५ हजार ७६२ टन खतांची विक्री झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Supplier Action: दर्जाहीन कापूस वेचणी, साठवणूक बॅगप्रकरणी कारवाई

Maharashtra Rain Forecast: राज्यात जोरदार पावसाची शक्यता

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

SCROLL FOR NEXT