Sunflower Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी वाढली; क्षेत्र ४००० हेक्टरवर

Sunflower Cultivation: खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी लक्षणीय वाढली असून, तब्बल ४००० हेक्टरवर हे पीक घेतले जात आहे. मागील काही वर्षांपासून पेरणी घटली होती.

Team Agrowon

Jalgaon News: कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुमारे ४००० हेक्टरवर झाली आहे. गेले चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती. परंतु यंदा पेरणी वाढली आहे. मागील वेळेस खानदेशात साडेतीन हजार हेक्टरवर सूर्यफूल पीक होते. यंदा पेरणी वाढली आहे.

कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने धुमाकूळ घातला. मका पिकालाही लष्करी अळीने विळखा घातला आहे. मका पीक खर्चिक झाले आहे. बाजरी, कांदा पिकांत दरांची शाश्वती नाही. बाजरीला यंदा फक्त १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. अशा स्थितीत धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर या भागांत काही शेतकरी सूर्यफुलाकडे वळले आहेत.

सूर्यफूल पेरणीत जळगाव, धुळे जिल्हा १० ते १५ वर्षांपूर्वी आघाडीवर होते. परंतु कमी दर व इतर कारणांमुळे सूर्यफुलाची पेरणी कमी झाली. अनेक भागांत पीक निसवले आहे. तर काही भागात पीक पक्व होत आहे. पेरणी यंदा डिसेंबर, जानेवारीत झाली आहे. काहींनी नोव्हेंबरमध्येही पेरणी केली. यामुळे पेरणीची आकडेवारी सतत वाढली.

कमी कालावधीच्या वाणांना पसंती मध्यंतरी सूर्यफूल पेरणीची नोंदही दिसत नव्हती. परंतु अलीकडे आलेले चांगले वाण, दरांची हमी, सिंचनाची गहू, मक्याच्या तुलनेत कमी गरज व कमी खर्च यामुळे सूर्यफूल पेरणीला यंदा बरा प्रतिसाद दिसत आहे.

पेरणी धुळ्यातील शिरपुरात सुमारे ४०० हेक्टरवर आहे. तसेच जळगावमधील चोपडा, यावल, जामनेरातही मिळून सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र आहे. तसेच इतर भागांतही पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. मळणीनंतर ओल्या सूर्यफूल पिकास चांगले दर मिळण्याची स्थिती सध्या आहे. एकरी चांगला नफा सुटेल, असे चित्र सध्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT