Agriculture Transport Support: निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिवरस्त्यांचा प्रश्न महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत मार्गी लावला आहे. गेल्या २० वर्षांपासून बंद असलेले चार महत्त्वाचे शिवरस्ते मंगळवारी (ता. १२) प्रशासनाने शांततेत खुले केले. विशेष म्हणजे, आहेरगाव-वडनेरभैरव मार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी द्राक्षबाग हटविण्याची मोठी कारवाई प्रशासनाला करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा तसेच शेतमाल वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे..महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. रुई ते खेडलेझुंगे बोरमाथा हा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या २० वर्षांपासून बंद होता. मंडळ अधिकारी जयंत लिलके, भूमी अभिलेख विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत हा रस्ता खुला करण्यात आला..Farm Roads Development: कोल्हापुरात ३०६ पाणंद रस्ते होणार मजबूत.दात्याने-जिव्हाळे रस्ता मंडळ अधिकारी शशिकांत विधाते यांच्या नेतृत्वाखाली महसूल, कृषी व पोलिस विभागाच्या मदतीने मोकळा करण्यात आला. कुंदेवाडी-रौळस शिवरस्ता मंडळ अधिकारी अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या सहकार्याने अतिक्रमण हटवून खुला करण्यात आला. .Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले.आहेरगाव-वडनेरभैरव मार्गावर रस्त्यात आलेली द्राक्षबाग मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर केसरे, तंटामुक्ती समिती सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हटविण्यात आली. तर धारणगाव खडक-धानोरे शिवरस्ता खुला करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांनी दिली. या मोहिमेत महसूल सहाय्यक शरद घाडगे, मच्छिंद्र भारस्कर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला..शासनाच्या धोरणामुळे आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गेल्या ५० वर्षांपासून बंद असलेले प्रलंबित रस्ते आता मोकळे होऊ लागले आहेत. उर्वरित बंद रस्तेही खुले करण्यात येतील. शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. आणखी काही रस्ते बंद असल्यास त्याची माहिती द्यावी. ते रस्ते मोकळे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, हीच प्रशासनाची भूमिका आहे.- दिलीप बनकर, आमदार, निफाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.