Summer Bajari Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Bajari : आंबेगावात उन्हाळी बाजरीला फुलोरा

Summer Crop : फुलवडे, बोरघर, अडिवरे, दिगद, कुशीरे बुद्रुक, कुशीरे खुर्द सावरली, पाटण (ता. आंबेगाव) परिसरात गाळपेर करून बाजरी पीक हे प्रामुख्याने घेतले जात आहे.

Team Agrowon

Pune News : फुलवडे, बोरघर, अडिवरे, दिगद, कुशीरे बुद्रुक, कुशीरे खुर्द सावरली, पाटण (ता. आंबेगाव) परिसरात गाळपेर करून बाजरी पीक हे प्रामुख्याने घेतले जात आहे. यावेळी उन्हाळी बाजरी पीक हिरवेगार दिसत असून पीक फुलोऱ्यात आले आहे.

उन्हाळ्यात स्वच्छ व दमदार हवामान उपलब्ध होत असल्याने बाजरीचे पीक जोमदार येते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात सुटत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीचे पीक घेत आहेत.

आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पिकाचे क्षेत्र ४०० हेक्टर असून सरासरी उत्पन्न हेक्टरी ४५ क्विंटल इतके येते. हवामान उष्ण व कोरडे असल्याने रोग व किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने उन्हाळी बाजरी पिकाच्या उत्पादनात मोठी वाढ होते. धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाल्यावर उन्हाळी बाजरी पिकाची लागवड केली जाते.

यामध्ये मागील काही वर्षात गाळपेर क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना भातासोबत बाजरीचे उत्पादन चांगले घेता येते. परंतु मागील दोन ते तीन वर्षांत गाळपेर क्षेत्रात घट होत आहे. धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने न सोडता सलग सोडल्याने ऐन दाणे भरण्याच्या स्थितीत पाण्याअभावी उत्पादनात घट होणार आहे.

मागील वर्षापेक्षा या वर्षी कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. लांबवरून पाणी आणून पिकास देणे शक्य होत नाही. धरणातून टप्प्या-टप्प्याने पाणी सोडल्यास उन्हाळी बाजरीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल, असे कृषी विभागाचे कृषी साहाय्यक अरविंद मोहरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rasta Roko Protest : वडखळ-अलिबाग राज्यमार्ग दीड तास ठप्प

India Trade Policy: टॅरिफ बनले शस्त्र, पण भारत कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, अन्न सुरक्षेबाबत कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच, उडदाचे भाव कमी, केळीचे दर स्थिर, कारलीला उठाव तर गवार तेजीतच

Farmer Relief : औशाचे आमदार करणार शेतकऱ्यांना मदत

SCROLL FOR NEXT