Bajari Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Summer Bajari : येत्या काळात बाजरीचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने खेड तालुक्यात चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पेरणीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजरीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून अनेक ठिकाणी पिके कणसाच्या व काढणीच्या अवस्थेत आहेत. येत्या काळात बाजरीचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने खेड तालुक्यात चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.

उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार ८२० हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल असून पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात बाजरीचे सरासरी चार हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार हजारांहून अधिक हेक्टरवर पेरणी केली होती. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो. त्याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्ह्याळ्यात बाजरी पीक घेण्यावर भर दिला आहे. पावसाळ्याच्या तुलनेत उन्ह्याळ्यात रोग किडीचा कमी प्रादुर्भाव आणि चांगले उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचा चाराही उन्हाळ्यात उपलब्ध होतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करीत आहेत.

यंदा खेड तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची झाली आहे. खेडमधील वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सोयगाव, वेताळे अशा अनेक गावांत मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली आहे.

जुन्नरमध्येही नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतर्फे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर, रोकडी, उब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव चावा अशा बहुतांशी गावात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर, नागापूर, अवसरी, धामणी, कळंब, मंचर, पेठ अशा अनेक गावांत मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली.

तालुकानिहाय झालेली उन्हाळी बाजरीची पेरणी (हेक्टरमध्ये)

तालुका --- सरासरी क्षेत्र -- बाजरीची पेरणी

हवेली --- ६२० --- १९०

खेड -- ११३४ -- १५१९

जुन्नर -- २०६० -- १४३०

आंबेगाव -- ६९७ -- ५३१

मावळ -- १७६ -- ११८

शिरूर -- ५९ -- ६३

बारामती -- ४ -- २८

इंदापूर -- ० -- ११

मुळशी -- २२ --- ४०

एकूण --- ४२३३ -- ३८२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर

FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप

Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार

Drug case: अमलीपदार्थ कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा घ्या : हर्षवर्धन सपकाळ

Khandesh Farmer Issue: ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीककर्ज वसुली

SCROLL FOR NEXT