Bajara  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Bajara : उन्हाळी बाजरीचे पीक जोमात

गावासह परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक जोमात आले आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणीही सुरू आहे.

Team Agrowon

कुंभार पिंपळगाव : गावासह परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक (Summer Bajara Crop) जोमात आले आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणीही सुरू आहे. दरम्यान, रानडुकरांकडून बाजरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) केले होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता रात्री शेतातच खडा पहारा ठेवला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून खरिपातील बाजरीच्या पिकाला पावसाचा फटका बसत आलेला आहे. परिणामी अनेक शेतकरी रब्बी हंगामात उन्हाळी बाजरीची पेरणी करत आहेत. बाजरीला चांगला भाव असल्याने व पीक कमी पाण्यात, कमी कालावधीत येत असल्याने मोठे उत्पन्न मिळते.

यावर्षीही परिसरात मोठ्या प्रमाणात बाजरीचा पेरा आहे, अनेक ठिकाणी पीक फुलोऱ्यात, हुरड्यात तर काही ठिकाणी परिपक्व होऊन काढणीला आले आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे रानडुकरांकडून पिकांची नासाडी होत असल्याने अनेक शेतकरी रात्रभर बॅटरी घेऊन पिकाच्या कडेने फिरून खडा पहारा देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT