Sugarcane Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊसतोड कामगारांचा यंदा मजुरी दरवाढीसाठी संप

Sugarcane Labor Strike : ऊसतोडणी कामगार मुकादम व वाहतूकदार यांच्या दरात वाढ करणे व इतर मागण्या मान्य कराव्यात आणि ऊस तोडणी कामगारांच्या मजुरी दरात ५० टक्के वाढ करावी या मागणीसाठी ऊसतोडणी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : ऊसतोडणी कामगार मुकादम व वाहतूकदार यांच्या दरात वाढ करणे व इतर मागण्या मान्य कराव्यात आणि ऊस तोडणी कामगारांच्या मजुरी दरात ५० टक्के वाढ करावी या मागणीसाठी ऊसतोडणी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी याबाबत साखर संघाच्या अध्यक्षांना संप करणार असल्याचे पत्र दिले आहे.

राज्यात बारा ते पंधरा लाख मजूर ऊसतोडणीचे काम करतात. यंदाचा कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत आहे. साधारणतः दसऱ्यानंतर मजुरांचे कारखान्याकडे स्थलांतर सुरू होत असते. यंदा मात्र मजुरांच्या संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता ऊस तोडणी कामगारांसाठी दिली जाणारी मजुरी अल्प आहे.

सध्या ऊसतोड कामगाराला डोकी सेंटरला २७३ रुपये, गाडी सेंटरला ३०४ रुपये, तर टायर बैलगाडीला ३०४ रुपये प्रति टन व प्रति किलोमीटर ला १४ रुपये टनाला पैसे मिळत आहे. राज्यात ऊसतोड कामगारांचे नेते गहिनीनाथ थोरे पाटील यांच्यासह अन्य संघटनांनी मिळून १९८६ ला राज्यात मोठा संप पुकारला.

आत्तापर्यंत १९८६, १९८९, १९९२, १९९५ ,१९९९, २००५, २००९, २०१०, २०११, २०१४, २०२० या वर्षी ऊसतोड कामगारांचे संप झाले. मात्र सध्याच्या महागाईचा आणि मजुरीचा दर पाहता पुरेसा दर नसल्याने तसेच ऊस तोडणी कामगारांच्या मजुरी बाबतच्या कराराला तीन वर्षे पूर्ण होत असून, यावर्षी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊस तोडणी कामगाराचा संप पुकारला आहे.

सध्या मिळत असलेल्या तोडणी कामगारांच्या दरात ५० टक्के वाढ व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे दरवाढ झाल्याशिवाय मजुरांनी कारखान्यावर जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

अशा आहेत मागण्या

- ऊसतोड कामगारांच्या मजुरीत ५० टक्के वाढ, तर मुकादम कमिशन, वाहतूकदारांच्या ट्रक, ट्रक्टरमधील दरात दुप्पट वाढ करण्यात यावी.

- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंबलबजावणी ठरल्याप्रमाणे साखर आयुक्त व साखर संघाने करावी व विम्याची रक्कम पाच लाख करावी.

- ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्याच भागात निवासी आश्रम शाळा सुरू कराव्यात. केंद्र सरकारकडून ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी व वाहतुकीवरील व्यवसायात कपात केलेला इन्कमटॅक्स कपात करू नये.

- नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऊसतोडणी कामगार उन्नती प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात यावा.

- ऊसतोड कामगारांना शासनाच्या निधीतून कामगारांना घरकुल मिळावे. कारखाना परिसरातील निवासाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व विजेची व्यवस्था करावी.

- आरोग्याची मोफत व्यवस्था करत मुकादम व कामगार यांना शासनाकडून ओळखपत्र मिळावे. कामगारांच्या मुलांना नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळावे, साखर कारखान्यात नोकरी मिळावी.

सध्याचा महागाईचा विचार करता ऊसतोड कामगारांच्या मजुरी दरात दुपटीने वाढ होणे गरजेचे आहे. तीन वर्षांचा मजुरीचा करार संपला आहे. कामगारांच्या मजुरी दरात ५० टक्के वाढ करावी यासाठी संप पुकारण्यात येणार आहे. तसेच, मागण्या मान्य झाल्याशिवाय मजूर गाव सोडणार नाहीत.
- गहिनीनाथ थोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT