Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : चालू हंगामात उचल जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी नको

Sugarcane FRP Update : अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २०२३-२४ च्या हंगामातील उसाची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे यांनी निवेदनाद्वारे केली.

Team Agrowon

Nashik News : अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २०२३-२४ च्या हंगामातील उसाची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे यांनी निवेदनाद्वारे केली. अहमदनगर येथील उपप्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

२०२३-२४ च्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल जाहीर करावी व मागील वर्षातील एफआरपी पूर्ण केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी एफआरपी पूर्ण कलेली नाही.

शेतकरी हितासाठी दर लेखी प्रसिद्धी करावा

२०२३-२४ हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल ३५०० व अंतिम रक्कम ४००० रुपयांप्रमाणे जाहीर लेखी प्रसिद्द करावी; अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी व रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड बंद आंदोलन सुरू करणार आहे. या आशयाचे पत्र नगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या अध्यक्षांना देण्यात आले.

काही कारखाने पहिली उचलही वेळेवर देत नाहीत. जिल्ह्यात पाऊस वेळेवर न झाल्याने उसाची पाहिजे अशी वाढ झालेली नाही. उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. बराचसा ऊस जनावरांचा चारा म्हणून वापरला आहे. त्यामुळे २०२३-२४ साठी उसाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये, अंतिम रक्कम चार हजार रुपये मिळावी.

मागील एफआरपी पूर्ण न केलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी वजनकाट्यावर वजन केल्यास ते वाहन कारखान्याने खाली करून घ्यावे. ऊस वाहनाच्या वजनाची काटेमारी थांबण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम

SCROLL FOR NEXT