Dwarkadhish Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Dwarkadhish Factory : शेवरेच्या ‘द्वारकाधीश’ कारखान्यावर ऊस वाहतूकदार प्रबोधन शिबिर

Sugarcane Transport Awareness Camp : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखाना येथे राज्यातील पहिले ऊस वाहतूकदार प्रबोधन शिबीर झाले.

Team Agrowon

Nashik News : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखाना येथे राज्यातील पहिले ऊस वाहतूकदार प्रबोधन शिबीर झाले. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेनुसार आणि ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दरीकर,

नाशिक विभागाचे उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या व मार्गदर्शनाखाली हे शिबीर झाल्याचे महामार्गाचे धुळे विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सांगितले. ऊस गाळप हंगाम वेगात सुरू झाला आहे. ऊसतोडणी व वाहतुकीची धावपळ गावोगावी सुरू आहे. रिफ्लेक्टर नसल्यास अंधारातील ऊस वाहतुकीची बैलगाडी किंवा ट्रॅक्टर ट्रेलर अजिबात दिसत नाही.

त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आदळण्याची शक्यता असते, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी व वाहन चालकांमधील गैरसमज टाळावा यासाठी अवजड ऊस वाहतूकदार व

इतर वाहनधारकांनी वाहन कमी वेगात चालवावे. वाहन नादुरुस्त झाल्यास अडचणीच्या ठिकाणी न थांबविता पाठीमागच्या बाजूस ‘रिफ्लेक्टर’ लावून एलईडी लाइट लावावेत. जेणेकरून रात्री, पहाटे होणारे लहान-मोठे अपघात टळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अवजड वाहनचालकांनी रस्त्याची परिस्थिती पाहून वाहन चालवावे. जेणेकरून आपल्या वाहनांमुळे इतर रहदारीस अडथळा येणार नाही, असे उपनिरीक्षक चुनीलाल सैंदाणे यांनी स्पष्ट केले.

कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत, शेतकरी विभागाचे सतीश सोनवणे, उद्धव नहिरे, अनिल पाटील यांनी श्री. भामरे, श्री. सैंदाणे, हवालदार संदीप थोरात, पोलीस नाईक अमोल आव्हाड यांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, बाळासाहेब करपे, विजय पगार, शंकर साळुंखे, भूषण नांद्रे, ए. आर. सोनवणे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT