Tanaji Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याला अपघात; स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी
Kolhapur News : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात कोल्हापूर येथे रविवार (२४ रोजी) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झालेली नसून त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत.
याबात मिळालेली माहिती अशी की, मंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. ते एका कार्यक्रमासाठी भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये येत अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन ते जोतिबा दर्शनासाठी निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.
हा अपघात कोल्हापूर-रत्नागिरी माहामार्गावर रजपूतवाडी जवळ झाला. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच या अघतात सुदैवाने कोणतीच जिवतहाणी झाली नाही. मात्र त्यांते स्वीय सहाय्यक रविराज जाधव किरकोळ जखमी झाले. सावंत हे सुखरूप असून ते दुसऱ्या सरकारी वाहनाने जोतिबा दर्शनासाठी पुढे गेले आहेत. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दोन गाड्या एकमेकाला धडकल्या
कोल्हापूर-रत्नागिरी माहामार्ग हा रुंदीस लहान असल्याने येथे रहदारी प्रचंड आहे. दरम्यान सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. हा अपघात दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
आरोग्य मंत्र्यांनाच रुग्णवाहिका नाही
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला अपघात झाल्याचे उघड झाले आहे. यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी मात्र आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात रुग्णवाहिका नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.