Sugarcane FRP Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP Rate : ऊस दराचा दोन दिवसात तोडगा निघण्याची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी

Kolhapur Sugar Factory : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून ऊस दराच्या मुद्दावर शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्या जोरदार संघर्ष सुरू आहे.

sandeep Shirguppe

Raju Shetti Protest : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून ऊस दराच्या मुद्दावर शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्या जोरदार संघर्ष सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांच्या बाबतीत तीन बैठका होऊन ही तोडगा निघाला नाही. मागच्या दोन दिवसांपूर्वी तिसऱ्या झालेल्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमलेल्या समितीला 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मान्यता दिली.

यानंतर काल (ता.१७) शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांकडे माहिती मागविली आहे. आज, शनिवारी ही माहिती संघटनेला दिली जाणार असून, संघटना व कारखानदारांमध्ये सकारात्मक संवाद सुरू झाल्याने सोमवार (दि. २०) पर्यंत ऊस दराचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यातील गळीत हंगाम सुरू होऊन ३ आठवडे झाले तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू न झाले तरी तोडगा निघत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. याबाबत, जिल्हाधिकारी यांनी दोन बैठका तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी साखर कारखानदार, संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली.

यामध्ये मागील ४०० रुपयांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांनी सुरुवातीला समितीला विरोध केला, नंतर संमती दर्शविली. त्यानंतर काल दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होती. यावेळी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्विय्य सहाय्यक स्वस्तिक पाटील यांनी कारखान्याकडून मागील हंगामातील अपेक्षित माहितीचा नमुना दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखान्यांना पाठवून आज, शनिवारपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आज माहिती संघटनेला दिल्यानंतर आगामी दोन दिवसांत यावर चर्चा होऊन तोडगा निघू शकतो.

बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे, साखर कारखान्यांकडून विजय औताडे, पी. जी. मेढे, योगेश श्रीमंत पाटील, आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Farming: खानदेशात गहू पीक पेरणी सुरूच

Ravikant Tupkar: उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा: रविकांत तुपकर

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत किंचित वाढली रब्बी पेरणीची गती

New Pathways: नव्या वाटा-मार्गांवर चालूया...

Interview with Adv Sandip Paygude: कृषी विद्यापीठाची इंचभरही जमीन बळकावता येणार नाही

SCROLL FOR NEXT