Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : उत्तर प्रदेश सरकारकडून ऊस दरात प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ

Sugarcane Season : अनेक दिवसांपासून दर वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर युपी सरकारने पूर्ण केली आहे.

Team Agrowon

Lakhnau News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. चालू ऊस गाळप हंगाम २०२३-२४ साठी युपी सरकारने उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे.

अनेक दिवसांपासून दर वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर युपी सरकारने पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी उसाच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ केली आहे.

महाराष्ट्रात एफआरपीप्रमाणे उसाला दर दिला जातो. तर युपीमध्ये उसासाठी किमान आधारभूत किंमत दिली जाते. प्रति क्विंटल या हिशोबाने हा दर दिला जातो. यंदाच्या हंगामात राज्य सरकारने उसदरात प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ केली आहे.

सुरू लागवडीसाठीच्या ऊसाला सध्या ३५० रुपये प्रति क्विंटल दर दिला जातो. यामध्ये २० रुपयांची वाढ केल्यामुळे सुरू लागवडीच्या उसाचा दर ३७० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. यापूर्वी राज्य सरकारने २०२१ मध्ये उसाचे दर प्रति क्विंटल २५ रुपयांनी वाढविले होते. गेल्या वर्षीही शेतकरी संघटनांनी ५० रुपये दर वाढविण्याची मागणी केली होती.

दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांची ५० रुपये प्रति क्विंटलची मागणी धुडकावत २० रुपयांनी दर वाढविले आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी उसाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT