Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Sugarcane Plantation : वाळवा, मिरज तालुक्यांसह अन्य भागांत ऊस लागवडीची धांदल सुरू असल्याचे दिसते आहे. सद्यःस्थितीला ७ हजार १७३ हेक्टरवर लागवड झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काही अंशी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. वाळवा, मिरज तालुक्यांसह अन्य भागांत ऊस लागवडीची धांदल सुरू असल्याचे दिसते आहे. सद्यःस्थितीला ७ हजार १७३ हेक्टरवर लागवड झाली आहे. ऊस लागवडीची गती हळू हळू वाढू लागली असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आठ दिवस पावसाने उघडीप दिली. त्यातच मेच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी पूर्व मशागती करण्यासाठी अडथळे निर्माण झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या.

कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावात मे महिन्यात आडसाली हंगामातील उसाची लागवड केली जाते. परंतु मे महिन्यात पावसामुळे शेतकऱ्यांनी केल्या नाहीत. दरम्यान, जून महिन्यातही संततधार पाऊस सुरू होता. अशा पावसातही काही गावात शेतकऱ्यांनी ऊस लागवडही केली आहे.

सध्या जत, खानापूर, वाळवा, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ऊस लागवडी सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. अशा स्थितीतही शेतकरी लागवडीसाठी नियोजन करू लागला आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी रोपवाटिकेत रोपांची मागणीही नोंदणीला आहे.

तालुकानिहाय आडसाली हंगामातील उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

जत ७५

खानापूर २७८७

वाळवा २६६८

पलूस १४०७

कडेगाव २३६

एकूण ७१७३

गत वर्षीही पावसाचा अडथळा

गतवर्षी जून महिन्यात संततधार पाऊस पडला होता. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन कोलमडले होते. सप्टेंबर अखेर पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी आडसाली हंगामातील ऊस लागवड करण्याचे थांबवले होते. त्यामुळे गतवर्षी आडसाली हंगामातील उसाचे क्षेत्रही कमी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT