Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी धीम्या गतीने

Sugarcane Season : अनेकांनी गळीत हंगामाचा मुहूर्त केला असला तरी अजूनही फारशा वेगाने ऊस तोडणी सुरू नसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील ऊस हंगामास धीम्या गतीने सुरुवात झाली आहे. निवडणूक निकालानंतर ऊस तोडणी मजूर व ऊस तोडणी कर्मचारी कारखाना कार्यस्थळावर हजर झाले आहेत.

अनेकांनी गळीत हंगामाचा मुहूर्त केला असला तरी अजूनही फारशा वेगाने ऊस तोडणी सुरू नसल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३७०० रुपये पहिला हप्ता दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

या इशाराच्या पार्श्‍वभूमीवर काही कारखान्यांनी दबकत दबकत ऊस तोडणी सुरू केली आहे. ‘स्वाभिमानी’व्यतिरिक्त अन्य संघटनांनीही चार दिवसांपूर्वीपासूनच ऊस तोडणी सुरू असलेल्या कारखान्यांना विरोध करण्याचे धोरण अवलंबले आहे.

जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ऊस तोडणी करू न देण्याचा निर्धार काही संघटनांनी केल्याने अजूनही जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीने फार वेग घेतल्याचे चित्र नाही. सध्या पाऊस नसल्याने गतीने तोडगा निघून ऊस तोडणी वेगात सुरू होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही ऊस तोडणी गतीने सुरू करू, अशी प्रतिक्रिया कारखानदारांनी दिली.

जवाहर कारखान्याची ऊस तोड बंद पाडली

शिरढोण (ता. शिरोळ) येथे जवाहर साखर कारखान्याची ऊसतोड सोमवारी (ता. २५) ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. शिरढोणमधील सन्मती बँकेचे अध्यक्ष अजित कोईक यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर कोईक यांनी स्वतः तोड बंद केली.

उसाचा प्रतिटन दर ३७०० रुपये जाहीर केल्याशिवाय व मागचे दोनशे रुपये मिळाल्याशिवाय ऊस तोडी चालू करून देणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी धनाजी चुडमुंगे यांच्यासह राकेश जगदाळे, नागेश काळे, पप्पू मुंगळे, महेश जाधव, एकनाथ माने, संपत मोडके, अनिल हुपरीकर, रशीद मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

उसासाठी ३७०० रुपये उचलीबाबत बैठक घ्या : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ ॲाक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम २०२३-२४ चा २०० रुपयांचा अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रुपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून वरील मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या पंधरा दिवसांत तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे केली.

सोलापूर जिल्ह्यातील १०.८० रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांनी ३५०० रुपये पहिल्या उचलीचा दर जाहीर केला आहे. तर १२ ते १२.३० टक्के रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्यांना तोडणी वाहतूक वजा जाता ३७०० रुपये पहिली उचल जाहीर करण्यास काहीच अडचण नाही. येत्या पंधरा दिवसात जर काही निर्णय झाला नाही तर शासन व साखर कारखानदार यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागणार असून या आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा कडका राहणार: राज्यातील बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमानात घट

Karanja Assembly Constituency : कारंजा मतदार संघाला ४६ वर्षानंतर मिळाल्या पहिल्या महिला आमदार

Jayakwadi Dam : जायकवाडीतून मिळणार रब्बीसाठी तीन आणि उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तन

Agriculture Irrigation : सिंचनासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण

Rabi Season 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

SCROLL FOR NEXT