Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकवत आहेत. मार्च महिन्यात हा आकडा २०७ कोटी रुपये होता तर मे महिन्यापर्यंत कारखानदारांकडे १३४ कोटी रुपये थकले होते.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा जून अखेर नऊ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे जवळपास ९३ कोटी रुपये अडकले आहेत. साखर कार्यालयाने शेतकऱ्यांची उसाची रक्कम थकवणाऱ्या जिल्ह्यातील १६ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे सात कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम अदा केली.

उर्वरित कारखाने मात्र प्रशासनाच्या कारवाईला दाद देताना दिसत नाहीत. या कारखान्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा अब्दुलपुरकर यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकवत आहेत. मार्च महिन्यात हा आकडा २०७ कोटी रुपये होता तर मे महिन्यापर्यंत कारखानदारांकडे १३४ कोटी रुपये थकले होते.

यावेळी साखर कार्यालयाने पैसे थकवणाऱ्या १६ खासगी व सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आरआरसी ची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सुरू झाल्यानंतर ७ कारखान्यांनी त्यांच्याकडील थकलेले जवळपास ४२ कोटी रुपये दिले.

उर्वरित नऊ कारखान्यांनी मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम पूर्णपणे दिली नाही. यासंदर्भात साखर कार्यालय आर आर सी कारवाई अंतर्गत कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.

कारखानदारांच्या या आर्थिक नाकेबंदीमुळे ऊस उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. ऊस पुरवठा करून सहा महिने उलटले तरी अद्याप त्याच्या हातात दमडी पडली नाही. यामुळे त्याची बाजारातील पत कमी झाले आहे असा दवा केला जात आहे.

३० जूनपर्यंत या कारखान्यांकडे थकले पैसे

जय हिंद २५ कोटी ५ लाख

सिद्धेश्वर २३ कोटी ५८ लाख

गोकुळ १७ कोटी २१ लाख

पांडुरंग सहकारी ५ कोटी ८६

सिद्धनाथ ५ कोटी ६८ लाख

इंद्रेश्वर ४ कोटी ६३ लाख

सहकार

शिरोमणी ४ कोटी ४ लाख

भीमा सहकारी १ कोटी २५ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

Forest Fire: वनी वणवा पिसाटला

Maharashtra Politics: दानवेंच्या उमेदवारीवरून धुसफूस

SCROLL FOR NEXT