Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप सुरूच

Sugarcane Season : खानदेशात यंदा ऊस गाळप या महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु गाळप अद्याप सुरूच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा ऊस गाळप या महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु गाळप अद्याप सुरूच आहे. सुमारे ११ लाख टनांवर गाळप पूर्ण झाल्याची माहिती आहे. खानदेशात लहान-मोठे असे सहा साखर कारखाने सुरू आहेत. त्यात नंदुरबारात तीन कारखाने आहेत.

धुळ्यात एक लहान कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू असून, तेथेही रोज ६०० ते ७०० टन ऊस गाळप केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन खासगी व एक सहकारी साखर कारखाना सुरू आहे. लोणखेडा (ता. शहादा) येथील कारखाना सुरू होऊ शकला नाही. खानदेशात फक्त एकच सहकारी कारखाना नंदुरबारातील डोकारे (ता. नवापूर) येथे सुरू आहे. अन्य कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत.

खानदेशात सर्वाधिक सुंमारे सव्वासहा लाख टन ऊस गाळप समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने केले आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील घोडसगा (ता. मुक्ताईनगर) व चहार्डी (ता. चोपडा) येथील कारखान्यांनी ऊस गाळप केले आहे.

या कारखान्यांतून गाळप सुरूच आहे. एकूण ११ लाख टनांवर गाळप मागील आठवड्यापर्यंत झाले होते. काही कारखान्यांचे गाळप सुरूच आहे. समशेरपूर येथील कारखान्याने यंदा १२ लाख टनांवर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच चोपडा व मुक्ताईनगर येथील कारखान्यांनी देखील गाळपासंबंधी सुरुवातीपासून गती दिली आहे.

यंदा गाळप काहीसे उशिरा सुरू झाले. परंतु त्यातील सातत्यामुळे ऊस तोडणी सुरूच आहे. नंदुरबारात नोव्हेंबरमध्ये अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली होती. शहादा तालुक्यात अधिकचा पाऊस झाला होता. यामुळे या भागातील ऊस तोडणी अनेक दिवस बंद होती. डिसेंबरच्या मध्यानंतर तेथे ऊस तोडणी सुरू झाली. यामुळे ऊस गाळप यंदा मार्चच्या मध्यापर्यंत सुरू राहील, असेही संकेत आहेत. नंदुरबारात सर्वाधिक ऊस गाळप होत असल्याने या भागात तोडणी, वाहतूक वेगात सुरू आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT