Sugarcane Crushing : मराठवाडा, खानदेशात ७३ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील बावीस कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग घेतला आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील बावीस कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग घेतला आहे. या कारखान्यांनी १२ फेब्रुवारीअखेर ७३ लाख ५३ हजार २८७ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.४७ टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ३० हजार ११६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

खानदेशातील नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग नोंदविला. ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या साखर कारखान्यांपैकी १३ सहकारी साखर कारखान्यांनी ३४ लाख ४५ हजार ३३६ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९९ टक्के साखर उताऱ्याने २७ लाख ५४ हजार १६१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugar Factory
Sugarcane Crushing : पुणे विभागात १६९ लाख टन उसाचे गाळप

दुसरीकडे ९ खासगी कारखान्यांनी ३९ लाख ७ हजार ९५२ उसाचे गाळप करताना सरासरी ८.८९ टक्के साखर उताऱ्याने ३४ लाख ७५ हजार ९५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. आताच्या घडीला जालना, बीड व जळगाव या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एका कारखान्याचा ऊस गाळात हंगाम आटोपला आहे.

गतवर्षी १०९ लाख टन ऊस गाळपातून १०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाही त्याच्या आसपास ऊस गाळप व साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आतापर्यंत गाळपासाठी उपलब्ध असलेल्या उसापैकी जवळपास ७५ टक्के उसाचे गाळप झाले, असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्राने दिली. फेब्रुवारी येथील पर्यंत आठ ते दहा कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Sugar Factory
Sugarcane Crushing : ऊस गाळपास कासवगती

जिल्हानिहाय साखर उत्पादन व ऊस गाळप

नंदुरबार : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ८ लाख ४७ हजार ३००४ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.५२ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख २२ हजार १६७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जळगाव : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी १ लाख ८७ हजार ६६९ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.९१ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ६७ हजार २५६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३ सहकारी व ३ खासगी मिळून सहा कारखान्यांनी १४ लाख २५ हजार ४४ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.३९ टक्के साखर उताऱ्याने १३ लाख ३७ हजार ८०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून ५ कारखान्यांनी १८ लाख १७ हजार ५५६ टन उसाचे गाळप करत सरासरी ९ टक्के साखर उताऱ्याने १६ लाख ३५ हजार ६५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड : जिल्ह्यातील पाच सहकारी व दोन खासगी मिळून सात कारखान्यांनी ३० लाख ७५ हजार ७१५ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.७ टक्के साखर उताऱ्याने २३ लाख ६७ हजार २३३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com