Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer Conference: कोल्हापुरात २७ मे रोजी ऊस परिषदेचे आयोजन

One Country One Rate: कोल्हापूरमध्ये २७ मे रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण परिषद होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी ‘एक देश एक दर’ ही टॅगलाइन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिजीत डाके

Sangli News: ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने २७ मे रोजी कोल्हापूर येथे ऊस परिषद घेण्यात येणार आहे. समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच बैठकीत ‘एक देश एक दर’ ही टॅगलाइन करून शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कामगार भवन येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख होते. बैठकीस सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, परभणी, अहिल्यानगर येथील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्रात उसाला एकसारखा दर नाही. महाराष्ट्रात काही कारखाने तीन हजारांपेक्षा जास्त दर देतात, तर काही कारखाने अडीच हजारांपर्यंत दर देतात, तर याच देशातील गुजरात आणि तमिळनाडूत टनाचा दर चार हजारांपर्यंत आहे. यातही उपपदार्थांतील नफा देत नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशातील कारखान्यांनी टनाला पाच हजार रुपये दर शेतकऱ्यांना दिला पाहिजे,

अशी मागणी घेऊन ही परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले उपस्थित राहणार आहेत.

बैठकीस प्राचार्य ए. बी. पाटील, अमोल नाईक, (कोल्हापूर), माणिक अवघडे (सातारा), सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी (सोलापूर), गुलाब मुलाणी, रमेश पाटील, जयवंतराव सावंत, राजेंद्र वाटकर (सांगली) यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: जानेफळ येथे शेतकरी कंपनीच्या केंद्रावर सोयाबीन खरेदीला सुरुवात

Leopard Attack: वडिलांच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या हल्ल्यातून मुलाची सुटका

Agriculture Field Visit: ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ उपक्रमाअंतर्गंत प्रक्षेत्रभेटी

Agriculture Loan: ‘ॲग्रिकल्चर इज बेस्ट कल्चर’ शिबिराद्वारे एकूण २६ कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर

OTP Verification: ओटीपी प्रमाणीकरण मान्य करा

SCROLL FOR NEXT