Agrowon Farming Conference: ‘ॲग्रोवन’ वर्धापन दिनानिमित्त पुण्यात शाश्‍वत शेती परिषद

Pune Agriculture Event: 'ॲग्रोवन' वृत्तपत्र आपल्या २० वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त २० एप्रिल रोजी पुण्यात एकदिवसीय 'शाश्वत शेती परिषद' होणार असून, शेतीतील समस्या व उपायांवर तज्ज्ञ मंथन करणार आहेत.
Sustainable Farming Conference
Sustainable Farming ConferenceAgrowon
Published on
Updated on

Pune News: शेतकऱ्यांचे एकमेव मुखपत्र अशी ओळख निर्माण केलेले ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्र येत्या २० एप्रिल रोजी दोन दशकांची वाटचाल पूर्ण करून २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने पुणे येथे एकदिवसीय ‘ॲग्रोवन शाश्‍वत शेती परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेच्या उद्‍घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पणनमंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत.

Sustainable Farming Conference
Irrigation Conference: सांगोल्यात शनिवारपासून २१ वी सिंचन परिषद

हवामान बदल आणि आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेती क्षेत्रात कमालीची अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, काटेकोर शेतीचे युग सुरू झाले आहे. या दोन टोकांची सांगड घालून शेती शाश्‍वत कशी करता येईल, याची विविध प्रारूपे विकसित करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता आणि नावीन्यपूर्ण बाजार विक्री व्यवस्था या संकल्पनांचा अंगिकार करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या मुद्यांवर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंथन व्हावे, हा या परिषदेमागचा उद्देश आहे.

Sustainable Farming Conference
Agrowon Podcast: कांदा बाजारभाव दबावातच; आले, पपई, कापूस तसेच काय आहेत सोयाबीनचे दर?

बाणेर रस्त्यावरील महाराष्ट्र सरकारच्या ‘यशदा’ या प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य सभागृहात २० एप्रिलला (रविवारी) सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ही परिषद होईल. शाश्‍वत शेती या विषयाचा ध्यास घेतलेले आणि स्वतःचे एक प्रारूप विकसित केलेले प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, धोरणकर्ते, कृषी निविष्ठा क्षेत्रातील कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी, जैविक निविष्ठा क्षेत्रातील जाणकार, शेतीमाल पणन विषयातील तज्ज्ञ, कोरडवाहू शेतीचे अभ्यासक या परिषदेत सहभागी होतील. शेती, माती आणि बाजार या तीन पैलूंशी संबंधित विविध विषयांवर या परिषदेत सांगोपांग चर्चा होईल.

...अशी करा नोंदणी

ॲग्रोवन शाश्‍वत शेती परिषदेत अभ्यासू शेतकऱ्यांसह विविध संबंधित घटकांना प्रवेश मोफत असेल. मात्र मर्यादित जागांमुळे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून इच्छुकांनी त्वरीत नोंदणी अर्ज भरावा. परिषदेसाठी निवड झाल्याबाबतचा संदेश प्राप्त झालेल्यांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com