Sugarcane Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Conference : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या ऊस परिषद

Swabhimani Shetkari Sanghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद शुक्रवारी (ता. २५) दुपारी तीन वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : गतवर्षीच्या उसाचे अंतिम बिल प्रतिटन दोनशे रुपये तसेच या वर्षी तुटणाऱ्या उसाला एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)पेक्षा किती जादा दर निश्‍चित करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद शुक्रवारी (ता. २५) दुपारी तीन वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होत आहे.

परिषदेच्या तयारीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक सीमाभागात सभांचा धडाका सुरू ठेवला आहे. सोशल मीडियासह गावागावांतील स्वाभिमानीच्या शाखांमधून शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहतील यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

सभेस स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रकाश पोफळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

गतवर्षी तुटलेल्या उसाचा अंतिम भाव प्रतिटन दोनशे रुपये तसेच या वर्षी तुटणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा अधिक किती मागायचे याचा निर्णय ऊस परिषदेत होणार आहे. प्रतिटन तीन हजारांपेक्षा जादा दर देणाऱ्या कारखान्यांनी पन्नास रुपये तर तीन हजारांपेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांनी शंभर रुपये देण्याचा सर्वमान्य तोडगा स्वाभिमानीच्या आंदोलनावेळी निघाला होता. एफआरपीपेक्षा जादा भाव देण्यासाठी शासनाचे परवानगी घेण्यासाठी कारखानदारांनी प्रस्ताव दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT