Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : सोलापुरात उसाचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटले

Sugarcane Production : येत्या गाळप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : येत्या गाळप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आहे.

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामात साखर कारखान्यांची ऊस गाळपासाठी कसोटी लागणार आहे.

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात उसासाठी पाण्याची मोठी कमतरता जाणवली. त्यामुळे उसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही.

राज्यात ऊस उत्पादन घेणाऱ्या सोलापूरसह २७ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मागच्या वर्षी २ लाख १० हजार ९७० हेक्टर उसाचे क्षेत्र होते, यंदा ते १ लाख ५० हजार ५८६ हेक्टरवर आले आहे. साधारण ६० हजार ३७१ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे.

सोलापूर विभागात (सोलापूर व धाराशिव जिल्हे मिळून) सर्वाधिक एक लाख तीन हजार ४६५ हेक्टर उसाचे क्षेत्र घट झाली आहे. गतवर्षीचे राज्यातील हेक्टरी टनेज गृहीत धरले तर राज्यात या वर्षी १८३ लाख टन ऊस उत्पादन कमी होण्याचा संभव आहे. त्या टनेजनुसार सोलापूर जिल्ह्यात ४६ लाख टन, तर धाराशिव जिल्ह्यात ३३ लाख टन ऊस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Food: विविधतेचा बळी देऊन सपाटीकरण कशासाठी?

Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT