Sugar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : साखर उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत जाणार

WISMA Update : राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे साखर उत्पादनात वाढ होऊन ते ९५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) सुधारित अंदाजात म्हटले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे साखर उत्पादनात वाढ होऊन ते ९५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) सुधारित अंदाजात म्हटले आहे.

हंगामाच्या सुरुवातीस राज्यात ८८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज विस्मा, साखर आयुक्तालय व साखर संघाने व्यक्त केला होता. त्या वेळी अंदाजे ८ ते १० लाख टन साखर ईथेनॉलकडे वळवली जाणे अपेक्षित होते. मात्र असे घडले नाही त्यामुळे चालू हंगामात ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज विस्मा व साखर संघ यांच्या संयुक्त अभ्यासातून वर्तविण्यात आल्याचे ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

त्यांनी कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पूर्वीच्या अंदाजानुसार ८८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता होती. आधीच्या अंदाजानुसार सरासरी गाळप दिवस ९० ते १०० अपेक्षित होते. ते आता १२५ ते १३० पर्यंत गृहीत धरले आहेत. आधी एकूण ९४६ लाख टन ऊस उपलब्धता गृहीत होती. आता त्यात पाच टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे.

९९३ लाख टनांपैकी डिसेंबरअखेर ४२८ लाख टन गाळप झाले. त्यातून ३८.२० लाख टन साखर ६० दिवसांत तयार झाली. अद्याप ५६५ लाख टन गाळप बाकी आहे. उर्वरित ६० टक्के गाळपातून ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज खरा ठरू शकतो, असे ठोंबरे म्हणाले. केंद्राने आधी सिरपपासून इथेनॉलनिर्मितीवर घातलेली बंदी व त्यामुळे इथेनॉलकडे वळवलेल्या साखरेच्या वापरात झालेली घट यामुळेदेखील उत्पादन वाढेल.

देशात ३२० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

मागील वर्षीच्या साखर उत्पादनात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे महाराष्ट्र व कर्नाटकात साखर उत्पादनाचा अंदाज कमी वर्तवला होता. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक व गुजरातमध्येही ऑक्टोबर व नोव्हेबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने उसाच्या प्रति हेक्टरी उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ झाली. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादन असणाऱ्या उत्तर प्रदेशात डिसेंबरअखेर ३५ लाख टन उत्पादन झाले.

हंगामाअखेर १२५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक व गुजरात राज्यांमधील प्रत्यक्ष व अंदाजित उत्पादनवाढ विचारात घेता देशातील उत्पादन ३२० लाख टन होईल, असे बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. केंद्राने एकूण उत्पादन २९० लाख टन गृहीत धरून इथेनॉलनिर्मितीवर निर्बंध घातले. आता त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT