Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : राज्यात साखर उत्पादन नऊ लाख टनांनी घटले

Sugarcane Season : गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमीच आहे. शुक्रवारअखेर (ता. २२) झालेल्या गाळपात गेल्‍या वर्षीपेक्षा ९ लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : राज्‍यात गळीत हंगामाने वेग घेतला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमीच आहे. शुक्रवारअखेर (ता. २२) झालेल्या गाळपात गेल्‍या वर्षीपेक्षा ९ लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे.

गेल्‍या वर्षी या कालावधीत ३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते २९ लाखांपर्यंत आले आहे. राज्याचा साखर उताराही ९.२ वरून ८.६३ टक्क्यां‍पर्यंत खाली आला आहे.

यंदा १९४ साखर कारखान्‍यांनी हंगाम सुरू केला. गेल्‍या वर्षी ही संख्या १९९ होती. विशेष म्हणजे यंदाही गेल्‍या वर्षीइतकेच सर्व ९९ खासगी कारखाने सुरू झाले. तर ५ सहकारी साखर कारखाने सुरू होऊ शकले नाहीत.

केवळ पाच कारखाने बंद असले तरी गेल्‍या वर्षीच्या तुलनेत ऊस कमी मिळत आहे. अनेक कारखाने अजूनही पुरेशा क्षमतेने चालत नसल्यानेच साखर उत्‍पादनात पिछाडी असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. या कालावधीत ३४० लाख ऊस गाळप झाले. गेल्‍या वर्षी ४१७ लाख टन ऊस गाळप झाले होते.

हंगाम सुरू झाल्‍यानंतर पहिल्या पंधरवड्यात पाचव्या स्‍थानावर असणाऱ्या कोल्हापूर विभागाने साखर उत्पादनात २२ डिसेंबरअखेर अग्रस्थानावर झेप घेतली आहे. हा विभाग पुण्याबरोबरीने अग्रस्थानावर आहे.

कोल्‍हापूर विभागात ३७ साखर कारखान्‍यांनी ६९ लाख टन उसाचे गाळप केले. यातून ६.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यातही हाच विभाग आघाडीवर असून विभागाचा सरासरी साखर उतारा ९.८३ टक्के आहे.

ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन व आंदोलन संपल्यानंतर विभागातील ऊस पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या विभागातील हंगाम पिछाडला होता. पण गेल्या पंधरवड्यापासून चांगले वातावरण असल्याने ऊस तोडणीला गती आली. पुणे विभागातील २९ साखर कारखान्यांनी ७७ लाख टन ऊस गाळप करून ६.८ लाख टन साखरेचे उत्पादन केले.

या विभागाचा साखर उतारा ८.८६ टक्के आहे. सोलापूरमध्ये राज्‍यात सर्वाधिक ४७ साखर कारखाने सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात हा विभाग तब्बल १५ दिवस गाळपात आघाडीवर होता. सोलापूर विभागात ७४ लाख टन उसाचे गाळप झाले. ५.९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. उतारा ७.९४ टक्क्यांपर्यंत घसरला.

वाढती थंडी फायदेशीर ठरणार

राज्यातील ऊस पट्ट्यात अनेक ठिकाणी चांगली थंडी पडत आहे. याचा फायदा साखर उतारा वाढण्‍यासाठी होऊ शकतो. पावसामुळे ज्या भागात ऊसतोडणी यंत्रे थांबून होती त्या भागात आता चांगला वाफसा आल्याने यंत्रांनी तोडणी वेगात होत आहे. यामुळे येत्या पंधरवड्यात पाऊस न झाल्‍यास हंगामाचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-UK Trade Deal: भारत-इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही

Agriculture Irrigation Scheme: धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार

Turmeric Price: हळदीचे दर दबावात

Pomegranate Crop Loss: डाळिंब बागायतदारांवर कोसळले अस्मानी संकट

Maharashtra Rain: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT