Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ७५ लाख ८१ हजार टन ऊस गाळप

Sugarcane Season : यंदाच्या ऊस गाळपासाठी गतवर्षीच्या तुलनेत कमी ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या ऊस गाळपातून साखर उत्पादनही गतवर्षीच्या तुलनेत कमीच होणार अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन मिळून पाच जिल्ह्यात यंदाच्या ऊस गाळपात कारखान्यांनी ७५ लाख ८१ हजार २०५ टन उसाचे गाळप करत ५९ लाख ४० हजार ६४० क्विंटल साखरेचे उत्पादन या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.८४ टक्के इतका राहिल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

यंदाच्या ऊस गाळपासाठी गतवर्षीच्या तुलनेत कमी ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या ऊस गाळपातून साखर उत्पादनही गतवर्षीच्या तुलनेत कमीच होणार अशी स्थिती आहे. माहितीनुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या दोन जिल्ह्यातील मिळून २२ कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला.

यामध्ये १३ सहकारी तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश होता. १३ सहकारी साखर कारखान्यांनी ३२ लाख ७१ हजार ९१२ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.७ टक्के साखर उताऱ्याने २५ लाख २० हजार ५७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर खासगी ९ कारखान्यांनी ४३ लाख ९ हजार २९४ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९४ टक्के साखर उताऱ्याने ३४ लाख २० हजार ७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जिल्हानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन, उताऱ्यांसह

नंदुरबार : जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ७ लाख ८६ हजार ९१३ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.३१ टक्के साखर उताऱ्याने चार लाख ९६ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जळगाव : जिल्ह्यातील एका कारखान्याने एक लाख ४ हजार ३२९ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.७ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ५ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सात कारखान्यांनी १६ लाख ७८ हजार १८० टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८३ टक्के साखर उताऱ्याने १६ लाख ४८ हजार ९२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी १८ लाख ८७ हजार ४३१ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.३ टक्के साखर उताऱ्याने १५ लाख ६६ हजार ५८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड : जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी ३१ लाख २४ हजार ३५३ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.८ टक्के साखर उताऱ्याने २१ लाख २३ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

सहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव व नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील सहा कारखान्यांचा गाळप हंगाम आत्तापर्यंत आटोपला आहे. त्यामध्ये नंदुरबार मधील दोन, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड मधील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Montha Cyclone: ‘मोंथा’ चक्रीवादळ चिंता वाढवणार; विदर्भात दोन दिवस चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज

Government Scheme Grant : निराधार, भूमीहीन शेतमजुंरांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा ; ९६ कोटींच्या निधी वाटपाचा शासन निर्णय जारी

Soybean MSP : सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांचे झोपा काढो आंदोलन

Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळ नुकसान भरपाईसाठी ४५३ कोटींचा निधी मंजूर

Agriculture Department: कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आता कायमस्वरूपी सिम कार्ड; बदली झाली तरी शेतकऱ्यांना त्याच नंबरवर संपर्क साधता येणार

SCROLL FOR NEXT