Sugarcane Season : साताऱ्यातील तीन कारखान्यांनी उरकले गाळप

Sugarcane Crushing : ऊस गाळपाचा हंगाम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत किसन वीर, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड-अजिंक्यतारा या तीन कारखान्यांनी गाळप उरकले आहे.
Sugarcane Farming
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Satara News : ऊस गाळपाचा हंगाम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत किसन वीर, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड-अजिंक्यतारा या तीन कारखान्यांनी गाळप उरकले आहे. उर्वरित कारखाने मार्चअखेरपर्यंत गाळप उरकण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून ८४ लाख २२ हजार ६०८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८० लाख ३७ हजार ३४५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सर्वाधिक सरासरी ११.२९ टक्के साखर उतारा सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे, तर सर्वाधिक १३ लाख ४० हजार मेट्रिक टन ऊस गाळप जरंडेश्वर साखर कारखान्याने केले असून, रयत अथणी शुगरने १२.०८ टक्के साखर उतारा घेत आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी नोव्हेंबरपासून गाळपास सुरुवात केली असून, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या सर्वांनी मिळून ८४ लाख २२ हजार ६०८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यावर्षी साखर उताऱ्यात सहकारी साखर कारखाने आघाडीवर दिसत आहेत. आता गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे.

खासगी कारखान्यांनी ४४ लाख ५९ हजार ७५१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३५ लाख ६४ हजार २५५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना ७.९९ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी ३९ लाख ६२ हजार ८५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४४ लाख ७३ हजार ९० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ११.२९ टक्के साखर उतारा मिळालेला आहे.

Sugarcane Farming
Sugarcane Season : उत्तर सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंद

जरंडेश्वर साखर कारखान्याने सर्वाधिक १३ लाख ४० हजार ५२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ३४ हजार ९०० क्विंटल साखरेची निर्मिती करत आघाडी घेतली आहे, तर सर्वाधिक १२.०८ टक्के उत्तारा रयत अथणी शुगरला मिळाला आहे.

तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळित असूनही यावेळेस गाळपाचे आकडे कोटीकडे वाटचाल करू लागले आहेत. आतापर्यंत वाई तालुक्यातील किसन वीर साखर कारखाना, खंडाळा कारखाना व जावळीतील प्रतापगड-अजिंक्यतारा साखर कारखाना या तीन कारखान्यांचे गाळप उरकले आहे. उर्वरित कारखाने मार्चअखेरपर्यंत गाळप आटोपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sugarcane Farming
Sugarcane Season : पिंपळनेरच्या शिंदे कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

मजुरांची उपलब्धता वाढली

इतर जिल्ह्यांतील अनेक साखर कारखाने बंद झाले आहेत. यामुळे तेथील ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने मोठ्या गावात १० ते १५ मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्याने ऊस तोडणीस वेग आला आहे. सध्या मिळेल तो ऊस तोडला जात असल्याने ऊस क्षेत्र कमी राहिले आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखाना कार्यालयास घालावे लागणारे हेलपाटे कमी होऊ लागले आहेत. मात्र, अचानक उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने तोडणीवर काहीसा परिणाम होत आहे.

मार्चअखेरपर्यंत हंगाम

तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळित असूनही यावेळेस गाळपाचे आकडे कोटीकडे वाटचाल करू लागले आहेत. आतापर्यंत वाई तालुक्यातील किसन वीर साखर कारखाना, खंडाळा कारखाना व जावळीतील प्रतापगड-अजिंक्यतारा साखर कारखाना या तीन कारखान्यांचे गाळप उरकले आहे. उर्वरित कारखाने मार्चअखेरपर्यंत गाळप आटोपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com