Sugarcane Season : सांगलीत तीन कारखान्यांची धुराडी थंडावली

Sugarcane Crushing : जिल्ह्यातील १७ पैकी १० कारखाने सहकारी तर ७ कारखाने खासगी आहेत. जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. जिल्ह्यातील उपलब्ध उसापैकी सुमारे ८० टक्क्यांहून अधिक उसाचे गाळप झाल्याचे सांगण्यात आले.
Sugar Factory
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७१ लाख २२ हजार ६१५ टन उसाचे गाळप करत ७४ लाख ४२५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यापैकी तीन साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम आटोपला आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा १०.३९ टक्के आहे.

जिल्ह्यातील १७ पैकी १० कारखाने सहकारी तर ७ कारखाने खासगी आहेत. जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. जिल्ह्यातील उपलब्ध उसापैकी सुमारे ८० टक्क्यांहून अधिक उसाचे गाळप झाल्याचे सांगण्यात आले. उताऱ्यात ‘हुतात्मा’ तर गाळपात ‘सोनहिरा’ कारखाना आघाडीवर आहे. कुंडल साखर कारखान्याने सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Sugar Factory
Sugarcane Season : उत्तर सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंद

जिल्ह्यातील सद्यःस्थितीला १४ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. बहुतांश कारखान्याच्या लाभ क्षेत्रातील ऊस संपत आला आहे. रस्त्याकडील ऊस नेण्यासाठी आता कारखान्यांची स्पर्धा सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील म्हणजे जत, मिरज तालुक्यांचा पूर्व भाग आणि आटपाडी तालुका या भागातील राजारामबापू युनिट ४, मोहनराव शिंदे, आरग, सदगुरु श्रीश्री या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

Sugar Factory
Sugarcane Season : साताऱ्यातील तीन कारखान्यांनी उरकले गाळप

एकरकमी उचलमुळे आंदोलने नाहीत

जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रकमी पहिली उचल जाहीर केली. त्यामुळे यंदा शेतकरी संघटनांनी ऊस दराबाबत आंदोलन केले नाही. परिमाणी ऊस गाळपास अडचणी आल्या नसल्याचे चित्र आहे. यामुळे गाळप हंगाम वेळेत सुरू झाल्याने हंगाम लवकर संपण्याचे चित्रे आहे.

साखर कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

श्री दत्त इंडिया ७,७९,५७० ८,१०,२२० १०.४७

राजारामबापू युनिट १ ५,६९,०४० ६,५२,७०० ११.६

विश्‍वास, चिखली ४,२२,७९० ५,०२,५४० ११.९७

हुतात्मा, वाळवा ४,३७,५१० ४,८८,५२५ १२.७८

राजारामबापू युनिट २ ३,६४,०४० ४,५५,४०० १२.४८

एस ई झेड तुरची ४१,३२० २२,८४० ७.४८

राजारामबापू युनिट ४ २,०५,३६५ २,२६,७०० १०.३३

सोनहिरा, वांगी ८,९१,४६० ८,०४,३५० ९.११

क्रांती अग्रणी, कुंडल ८,२८,२०० ८,७९,४१० १२.१

राजारामबापू युनिट-३ २,६३,९७० ३,१६,२३० १२.२१

मोहनराव शिंदे, आरग ३,१७,९८५ ३,४५,५०० १०.९२

दालमिया, कोकरूड ४,१७,८६० ५,१२,४०० १२.२९

यशवंत शुगर, नागेवाडी १,६२,७५० १,८४,२८५ ११.४४

रायगाव शुगर १,४००,९० १,३९,७०० १०.७९

उदगिरी, खानापूर ४,७७,९३१ ३,४८,००० ७.२८

सदगुरु श्रीश्री ४,८९,१४४ ३,६४,२५५ ७.३७

श्रीपती शुगर, डफळापूर ३,१३,५९० ३,४७,३७० ११.२४

एकूण ७१,२२,६१५ ७४,००,४२५ १०.३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com