Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : साखर कारखाने वळाले औद्योगिक सुरक्षेकडे

Sugar Mills News : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी आता आधुनिकीकरणाबरोबरच औद्योगिक सुरक्षिततेवर (इंडस्ट्रिअल सेफ्टी) लक्ष केंद्रित केले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी आता आधुनिकीकरणाबरोबरच औद्योगिक सुरक्षिततेवर (इंडस्ट्रिअल सेफ्टी) लक्ष केंद्रित केले आहे. कारखान्यांमधील अपघात टाळण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात दोनशेच्या आसपास साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमधील आधुनिकीकरणाबाबत सातत्याने चर्चा होत असते. मात्र अपघात टाळण्यासाठी उपाययोजना अंमलबजावणीकडे असे लक्ष दिले जात नाही.

त्यामुळेच आता महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा ) व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (ता.१७) पुण्यात संस्थांचे पदाधिकारी साखर कारखान्यांमधील औद्योगिक सुरक्षा दिवसभर मंथन करणार आहेत.

राज्यात लागू असलेल्या १९४८ च्या कंपनी कायद्यातील चांगल्या तरतुदी तसेच, १९६३ चा महाराष्ट्र कारखाने नियमावलीतील उपयुक्त तरतुदींचा अभ्यास राज्यातील साखर कारखान्यांकडून केला जात आहे.

‘‘साखर कारखान्यांमधील अपघात टाळण्यासाठी आम्ही गांभीर्यपूर्वक पावले टाकत आहोत. त्यासाठीच एक दिवसीय कार्यशाळा घेतली जात आहे. त्यात कारखान्यांमध्ये सुरक्षितपणे मळी, बगॅस, इथेनॉलची हाताळणी कशी करावी, याबाबत चर्चा होईल.

आपत्कालीन व्यवस्थापन कसे असते, कसे राबवावे याविषयी मार्गदर्शन केले जाईल. कारखान्यांमध्ये सातत्याने आपत्कालीन स्थिती हाताळणारे सराव कवायती (मॉकड्रिल्स) होण्यासाठी प्रयत्न केले जातील," अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.

‘विस्मा’च्या सूत्रांनी सांगितले की, कारखान्यांमधील अपघात टाळण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्यविषयक बाबीवर उद्या होत असलेल्या कार्यशाळेत कामगारमंत्री सुरेश खाडे, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, राज्य कामगार मंत्रालयाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, ‘विस्मा’चे बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील तसेच राज्यातील औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आपली मते साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमोर मांडतील.

औद्योगिक सुरक्षा संचालक साधणार संवाद

साखर कारखान्यात अपुऱ्या जागेत गुंतागुंतीची यांत्रिक कामे हाताळावी लागतात. तसेच, उंचावरील कामे करावी लागतात. कारखाने कामगारांकडून अनेकदा उच्च वायू दाब व अति उष्ण प्रक्रियेशी निगडित कामकाज केले जाते; मात्र कामगारांना बहुतेक वेळा औद्योगिक सुरक्षा व आरोग्यविषयक माहिती व प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळेच राज्याचे औद्योगिक सुरक्षा संचालक दे. भ. मोरे आता कारखान्यांशी संवाद साधणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT