Sugar Lumps Karnataka Jaggery : कोल्हापूर बाजारसमितीत कोल्हापुरी गुळाबरोबर कर्नाटक सीमाभागातील गुळाचे रवे येत असतात. मागच्या काही काळात कर्नाटकच्या गुळामुळे कोल्हापुरी गुळाला आव्हान मिळत होते. मात्र, कर्नाटकातील गुळात साखरेचे प्रमाण आणि गुळाच्या गुणवत्तेबरोबर साखरेच्या गाठीही सापडू लागल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे गुजरातसह अन्य राज्यातील बाजारपेठेत 'कोल्हापुरी' गुळाला मागणी वाढली आहे. याचबरोबर कोल्हापुरी गुळाच्या दरातही तेजी आल्याचे मत गूळ उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कोल्हापूरची माती आणि पाण्यामुळे कोल्हापुरी गुळाला वेगळी चव असते यामुळे या गुळाला देशातून मागणी असते. परंतु मागी ८ ते १० वर्षांत 'कोल्हापुरी' गुळासमोर कर्नाटकातील गुळाने बाजारात आगमन केले. कर्नाटकी गुळाची गुणवत्ता कमी आणि दिसायला पांढरा आणि कमी दराने हा गूळ मिळत असल्याने व्यापाऱ्यांनी कोल्हापुरी गुळाऐवजी या गुळाला जास्त पसंती दिली होती.
मात्र, अलीकडे कर्नाटकी गुळात प्रमाणापेक्षा साखरेचा वापर होऊ लागला आहे. यामुळे गुजरात बाजारपेठेत कर्नाटकातील गुळात साखरेच्या गाठी आढळल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. थंडीत गुळाला चव वाढत असल्याने मागणी वाढते, याच अनुशंगाने सध्या गुजरातमध्येही थंडी वाढल्याने गुळाला मागणी वाढली आहे. यामुळे उत्तम दर्जाच्या कोल्हापुरी गुळाला ५ हजारांच्या आसपास दर मिळत आहे.
कर्नाटकातील काही गुन्हाळघर चालक ६ ते ८ महिन्यांचा ऊस गुन्हाळघरावर गाळप करतात. त्यात निम्मी साखर मिसळून गूळ तयार केला जातो. यामुळे गुळाची गुणवत्ताच राहत नसल्याचे स्पष्ट मत व्यापाऱ्यांचे आहे.
कोल्हापुरातील गुऱ्हाळ घरे टिकवण्याचे आव्हान
मागच्या २० वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात करवीर, हातकणंगले, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, कागल तालुक्यात गावात १ ते २ सरासरी गुऱ्हाळ असायचे. परंतु आता तालुक्यात २ ते ४ गुऱ्हाळ राहिल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान भुदरगड, करवीर तालुक्यातील काही ठिकाणी मोजक्या कामगार आणि घरातील लोक्यांच्या मदतीने गुऱ्हाळ घरे टिकवण्याचे काम सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.