Gerbera Flower Rate
Gerbera Flower Rateagrowon

Gerbera Flower : जरबेरा फुलांचे दर पडले; कोल्हापुरातील २०० ग्रीनहाउस शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

Gerbera Flower Prices : जरबेराच्या १ फुलाचा उत्पादन खर्च २ रुपये असताना दर मात्र १ रुपया मिळत आहे. यामुळे ग्रीनहाउस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
Published on

Gerbera Flower Rate : बाजारातील प्लॅस्टिक फुलांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे नैसर्गीक फूल शेती उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जरबेराच्या १ फुलाचा उत्पादन खर्च २ रुपये असताना दर मात्र १ रुपया मिळत आहे. यामुळे ग्रीनहाउस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० शेतकरी आधुनिक हायटेक ग्रीनहाउस शेती करतात. कोरोनामुळे फूल शेती बंद पडली होती. यानंतर २ वर्षांत पुन्हा फुलांची मागणी वाढल्याने दरातही तेजी दिसून आली. मात्र, सध्या जरबेरासह गुलाबाचेही दर पडले आहेत. प्रदूषणाला भर घालणाऱ्या चायना, आर्टिफिशियल प्लॅस्टिक फुलांना मागणी वाढली आहे. कार्यक्रमात प्लास्टिक फुलांचा वापर केला जातो. यामुळे नैसर्गिक फुलांचे महत्व कमी होत आहे.

Gerbera Flower Rate
Kolhapur Milk Sanstha : कोल्हापुरातील ५०६ बोगस दूध संस्थांची नोंदणी रद्द; गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना फटका

हातकणंगले तालुक्यातील शिये गावचे ग्रीनहाउस शेतकरी शिवराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या उत्पादन खर्च वाढला आहे. मागणी नसल्यामुळे हायटेक ग्रीन हाउसमधील फूलशेती अडचणीत सापडली आहे. शासनाने कर्जाचे हप्ते आणि व्याजात सवलत द्यावी. अन्यथा नैसर्गीक शेतीला मारक ठरणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणावी. फूल उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने शासनाने फुलांचा हमीभाव ठरवून द्यावा. अशी मागणी पाटील यांनी केली.

जरबेरा फुलाचा दर १ रुपया झाल्यामुळे फुले काढण्याचा खर्चही भागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शेतकरी फुले काढून टाकत आहेत. या ग्रीनहाउससाठी काढलेले कर्ज, कर्जाचे हप्ते आणि व्याज मोठ्या प्रमाणावर असलेले आता शेतकऱ्यांना शेती विकल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र आहे.

पारंपरिक शेतीला फाटा देत गेल्या काही वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हायटेक ग्रीनहाउसमध्ये फूल शेती करण्यावर तरुण शेतकऱ्यांचा भर आहे. पुणे, सांगली, सातारा नाशिकनंतर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ग्रीनहाउसमध्ये शेती करण्यास सुरुवात झाली. ग्रीनहाउससाठी काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती सुरू केली आहे. यामध्ये ऑर्किड, जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन अशी फूल शेती घेतली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com