Santaji Ghorpade Sugar Factory Kolhapur : सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड या साखर कारखान्याच्या भागभांडवलासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये तपास करून पोलिसांनी कागलमधील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर पुराव्याअभावी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नसल्याचे म्हटले आहे. यातून त्यांना क्लिन चिट दिली काय? असा मुद्दा पुढे येत आहे. १३ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
विवेक विनायक कुलकर्णी यांनी २०२३ मध्ये मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेडसाठी भागभांडवल जमा करताना मुश्रीफ यांनी फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार मुरगूड पोलिस ठाण्यात मुश्रीफ यांच्यावर आयपीसी कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तपास अधिकाऱ्यांनी तपास केला आहे.
त्यानंतर त्यांनी फिर्यादीने ही फिर्याद केवळ ऐकीव आणि गैरसमजुतीतून दिली असून, लेखी अथवा कागदोपत्री पुरावे मिळत नसल्यामुळे आरोपपत्र दाखल केले नसल्याचे म्हटले आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि प्रभारी अधिकारी उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी हा तपास केला असून, कागलमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कागल न्यायालयात तो सादर केला आहे.
या अहवालात म्हटले आहे, की तपासात एकूण ७८ साक्षीदारांचे जाबजबाब घेतले आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. साधारण २८ पानी अहवालात ५० ठेवीदारांचे जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये साखर कार्ड व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड हा साखर कारखाना स्थापन झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला पाच किलो साखर माफक सवलतीच्या दरात मिळत असल्याचे मान्य केले आहे.
साक्षीदारांनी आरोपाबाबत कोठेही तक्रार केलेली नसल्याचे सांगितले आहे. तसेच फिर्यादी यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत कोणतीही कागदपत्रे अथवा कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. आमदार हसन मुश्रीफ यांनी गाव पातळीवरील सेवा संस्था, शिक्षण संस्था व इतर संस्थांचे संचालक व पहिल्या फळीतील कार्यकर्ते यांना सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड हा कारखाना उभा करण्यासाठी पाच ते सहा सभासद आणण्याचे कोणतेही आवाहन केले नव्हते.
तसेच ठेवी ठेवण्यासाठी प्रलोभन आणि बळजबरी केली नसल्याचे निष्पन्न होत आहे. फिर्यादी यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांच्याकडे लेखी पुरावे अगर कागदपत्रे नसल्याने त्यांचे आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.