Sugar Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Industry: कारखाने-शेतकऱ्यांना फायदा : बी. बी. ठोंबरे

B. B. Thombre: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना धान्यापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचा निर्णय कारखानदार आणि शेतकरी, विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विस्मा अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी या धोरणाचे स्वागत केले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : `केंद्र सरकारने २०१८ पासून धान्यापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाना राज्यात ५-६ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य आधारित डिस्टिलरीची उभारणी होऊन धान्यापासून इथेनॉल निर्मितीस सुरवात झाली होती.

त्या सर्व साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास फार मोठा हातभार लागला. त्या राज्यातील मका व भात उत्पादनास चांगला भाव मिळाला. तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याची मान्यता द्यावी, म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो.

चार महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठका घेतल्या. त्यामुळेच शासनाने दुहेरी स्रोतापासून इथेनॉल निर्मिती करण्यास साखर कारखान्यांच्या डिस्टिलरींना परवानगी दिली आहे, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली आहे.

ते म्हणाले, की या धोरणामुळे कारखान्यांना बारा महिने डिस्टिलरी प्रकल्प चालविण्याची संधी उपलब्ध होईल. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. त्याचबरोबर राज्यातील मका, भात व इतर धान्य उत्पादकांच्या मालाला चांगला भाव मिळेल,` असा विश्वास ठोंबरे यांनी व्यक्त केला. `

राज्यात मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रचंड वाव आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी मक्याचे उत्पादन घेऊन नगदी पीक म्हणून त्यापासून चांगले उत्पन्न घेऊ शकतील, या दृष्टीने हा निर्णय साखर कारखाने व प्रामुख्याने कोरडवाहू शेतकरी या दोघांच्याही हिताचा व त्याला चांगला आर्थिक लाभ मिळवून देणार आहे,` असेही ठोंबरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT