
Mumbai News : राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या थकहमी पोटी रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राखून ठेवण्यात आलेली १०७ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम अखेर पाच सहकारी साखर कारखान्यांना देण्याचे आदेश सहकार सहकार विभागाने दिले आहेत. माजी आमदार अशोक पवार यांच्या घोडगंगा कारखान्याबाबत आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिल्याने थकहमीचा मार्ग मोकळा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
एनसीडीसीच्या थकहमीसाठी पात्र असूनही आपल्याला डावलल्याचा दावा करत रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर सुनावणी सुरू होती.
दरम्यान, रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी प्रस्तावित मंजूर होणारी रक्कम १०७ कोटी ६९ लाख रुपये राखून ठेवावी. तसेच पाच कारखान्यांना मंजूर करण्यात आलेली ५९४ कोटी ७६ लाख रुपयांपैकी उर्वरित मंजूर रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र या विरोधात विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, यशवंत नगर, सांगली, पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, वाळवे,
अशोक सहकारी साखर कारखाना अशोक नगर, अहिल्यानगर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, लातूर या कारखान्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र यामध्ये हंगाम वाया जाण्याची भीती असल्याने सरकारने सकारात्मक भूमिका घेत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला पुढील हंगामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार कारखान्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही माहिती देत सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, त्यामुळे अन्य कारखान्यांची राखून ठेवलेली १०७ कोटी ६९ लाख रुपयांची रक्कम देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाने पाच सहकारी साखर कारखान्यांबाबात चार आठवडे तर रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारनेही याबाबत सकारात्मक बाजू मांडल्यानंतर संबंधित कारखान्यांचे उर्वरित पैसे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर सहकार विभागाने तसा शासन आदेश काढला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.