Water Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project : पेण तालुक्यातील बाळगंगा धरणग्रस्तांच्या नशिबी यातना

धरणाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

Team Agrowon

Pen News : तालुक्यातील बाळगंगा धरणाच्या कामाला १२ वर्ष पूर्ण होत आली आहेत, तरीही धरणाचे काम पूर्णत्‍वास गेलेले नाही. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाळगंगा धरणाच्या संदर्भात आवाज उठविला जाणार असल्याची खात्री येथील प्रकल्पग्रस्तांना होती.

मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने धरणाचे काम कधी पूर्ण होणार, पाणीटंचाईची समस्‍या कधी मार्गी लागणार, असे प्रश्‍न प्रकल्‍पग्रस्‍तांकडून विचारण्यात येत आहे.

तालुक्यातील जावळी, निधवली या भागातील जवळपास १२ महसूल गावे व १३ आदिवासी वाड्या तर ६ मोठ्या ग्रामपंचायतीतील तीन हजारांहून अधिक कुटुंबे बाळगंगा धरणामुळे बाधित होत आहेत.

आजतागायत या धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम अद्याप बाकी आहे. धरणाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

प्रकल्पग्रस्तांनी आधी पुनर्वसन, मग धरण याकरिता अनेक आंदोलने केली, मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

बाळगंगा धरणासाठी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भूखंड वाटप, घरांच्या किमती, पुनर्वसन आराखडा हे सर्व प्रश्न आजपर्यंत सुटले नसल्याने दिवसेंदिवस या भागाच्या समस्या अधिकच जटिल होत आहेत.

गावांतील रस्त्याची दैना झाली असून या खोऱ्यातून येणाऱ्या अनेक विद्यार्थी, आदिवासी बांधव, महिला वर्ग, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT