Sowing Delayed Due to Poor Seeds: विदर्भातील खरीप हंगामात बोगस व निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका केवळ उगवणीपुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचा थेट पेरणीवर परिणाम झाला आहे. यंदा १७ लाख ७७ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन असताना आतापर्यंत केवळ ६८ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. .उर्वरित ३२ टक्के क्षेत्र अद्याप पेरणीविना असून, दुसरीकडे बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परराज्यांतून मोठ्या प्रमाणात झालेल्या निकृष्ट बियाण्यांच्या शिरकावामुळे कृषी विभागाच्या यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडे बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बोगस व निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची विक्री झाल्याची बाब समोर आली आहे..Soybean Seed Germination Failure: सोयाबीन बियाणे उगवण होत नसल्याने अकोल्यात ‘ठिय्या’.अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मे महिन्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांची विक्री केल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकाराकडे यंत्रणेने वेळेत लक्ष न दिल्याने मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. विदर्भात यंदा १७ लाख ७७ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी अपेक्षित होती. त्यापैकी १२ लाख ९ हजार ९५६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ६८ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागात अपेक्षित १४ लाख ६३ हजार ४११ हेक्टरपैकी ११ लाख ५३ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण ७९ टक्के आहे..तर नागपूर विभागात अपेक्षित ३ लाख १४ हजार ४२७ हेक्टरपैकी केवळ २ लाख १२ हजार ४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून येथे पेरणीचे प्रमाण फक्त ६४ टक्के आहे. त्यामुळे नागपूर विभागात अद्याप ३६ टक्के क्षेत्र पेरणीपासून वंचित आहे. यंदा विदर्भासाठी १ लाख ६२ हजार ५५३ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज होती. त्याच्या तुलनेत राज्यात २ लाख ४६ हजार ३१२ क्विंटल बियाणे उपलब्ध होते..Defective Soybean Seeds Issue: निकृष्ट सोयाबीन बियाणेप्रकरणी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक.बियाण्यांची कमतरता नसतानाही बोगस व निकृष्ट बियाण्यांची विक्री झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने किंवा अत्यल्प उगवण झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. निकृष्ट उगवणीबाबत अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून १ हजार १४५ हून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. तर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतून ९० हून अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, त्यापैकी वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ७० तक्रारी आहेत..अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांतच ६०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बोगस बियाण्यांच्या प्रकरणात आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातमधून आलेल्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची चर्चा असताना आतापर्यंत केवळ दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ''साथी'' पोर्टलवर नोंदणी नसलेल्या बियाण्यांचीही विक्री झाल्याचे समोर आले असून, त्यामुळे बियाणे विक्री आणि देखरेख यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.