Sudhi Mungamwar  Agrowon
ॲग्रो विशेष

New College of Agriculture : राज्यात आणखी एक कृषी महाविद्यालय उभारण्याची मुंगटीवारांची घोषणा

College of Agriculture : मूल येथे होणाऱ्या या कृषी महाविद्यालयासाठी जागा जागा येत्या 10 दिवसांत शोधून निर्णय घ्या अशा सुचना अधिकाऱ्यांना मुनगंटीवार यांनी केल्या

Aslam Abdul Shanedivan

Chandrapur News : राज्यातील तरूणांचा कल हा शेतीकडे वाढावा, त्यांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे यासाठी नव्या कृषी महाविद्यालयाची घोषणा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी चंद्रपूर येथे केली. ते मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामाच्या आढावा बैठकीसाठी आले होते.

महाविद्यालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे केले जाईल. महाविद्यालय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वोत्कृष्ट राहील, असल्याची ग्वाही देखील यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.

"शेतात राबणारा शेतकरी अन्न पिकवितो, त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. कृषी आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. कृषी क्षेत्राचे बजेट ४ हजार कोटींवरून किमान १० हजार कोटी असणे आवश्यक आहे, त्यासाठी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल." असे ते म्हणाले.

तर मूल येथे होणाऱ्या या कृषी महाविद्यालयासाठी जागा जागा येत्या १० दिवसांत शोधून निर्णय घ्या अशा सुचना अधिकाऱ्यांना मुनगंटीवार यांनी केल्या. तसेच बांधकामासाठी आवश्यक जागा मिळाली नाही तर वनविभागाची जमीन वळती करण्यासाठी 13 कोटी 48 लक्ष रुपये विशेष निधी देण्यात येईल. त्यासाठी शासन निर्णय काढण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे मुनगंटीवार म्हणाले, "डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी २८ फेब्रुवारी २०१९ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्याप्रमाणे आतापर्यंत ३५ कोटी एवढे अनुदान विद्यापीठास देण्यात आले आहे. तर मूल-मारोडा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या उपलब्ध इमारती कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले असून ते सध्या मॉडेल स्कूल, मूल भाडेतत्वावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथे सन २०२३-२४ या कृषी शैक्षणिक सत्रात बी.एस.सी. (ऑनर्स) चे एकूण १८९ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

SCROLL FOR NEXT