Village Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Village Water Management : डोळ्यांत नव्हे, गावात पाणी आणणाऱ्या कथा!

Water Management : गावाने एकत्र येऊन केलेल्या पाणी व्यवस्थापनाच्या यशकथा आपण सर्वांना अभ्यासल्या पाहिजेत. विशेषतः तरुणांनी आपल्या गावात त्यातील काय काय करता येईल, याचा विचार आणि तशी कृती करायला हवी.

Team Agrowon

डॉ. नागेश टेकाळे
Village Development : गावाने एकत्र येऊन केलेल्या पाणी व्यवस्थापनाच्या यशकथा आपण सर्वांना अभ्यासल्या पाहिजेत. विशेषतः तरुणांनी आपल्या गावात त्यातील काय काय करता येईल, याचा विचार आणि तशी कृती करायला हवी. छोट्या छोट्या सातत्यपूर्ण कृतीमध्ये डोळ्यांतील पाणी चक्क गावामध्ये पाणी येऊ शकते.मा गील लेखात छत्रपती संभाजीनगर येथील शिरूर (ता. वैजापूर) या गावाने लोकसहभागातून केलेल्या पाणी व्यवस्थापनाची यशकथा मांडली होती. ही जून - जुलै म्हणजे जेमतेम दोन महिन्यांपूर्वीची यशकथा आहे. पूर्वी गावातील प्रणिती हे कुंड पाण्याने भरलेले असेल. मात्र त्यात गाळ साचत साचत त्याचे रूपांतर एखाद्या डबक्यामध्ये होऊन गेले होते.

लहानपणची आजोळची एक गोष्ट आठवली. उन्हाळ्यात आजोबांबरोबर सकाळीच दूर शेतावर जात असे. एकदा शेतातून दुपारी परत येताना मी तहानेने व्याकुळ झालो होतो. दूर झाडाखाली एक शेतकरी बसला होता. तेथे जाताच त्याने पुढे येऊन मला पाणी दिले. आजोबांनी मला त्याला वाकून नमस्कार करावला लावला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तहानलेल्या जिवांसाठी जल हे अमृत असते. ते देणारा हा नेहमी देवाच्या ठिकाणी असतो.’’ आज विचार करताना प्रा. विश्‍वास डांगे मला देवस्थानी पोहोचलेले दिसतात. आजही आपल्याकडे अनेक गावांत भीषण पाणीटंचाई दिसत असतानाही असे जलदाते पुढे येताना कुठेही दिसत नाहीत, हेच दुर्दैव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT