Goat Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Rearing : बारकावे समजून शेळीपालनात बसविला जम

Goat Farming : नांदेड जिल्ह्यातील खुतमापूर (ता. देगलूर) येथील सदाशिव बाबुराव पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. मागील दहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळीपालन सुरु केले आहे.

कृष्णा जोमेगावकर

कृष्णा जोमेगावकर

शेळीपालन

शेतकरी : सदाशिव पाटील

गाव : खुतमापूर,

ता. देगलूर जि. नांदेड

एकूण शेळ्या : ५०

नांदेड जिल्ह्यातील खुतमापूर (ता. देगलूर) येथील सदाशिव बाबुराव पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. मागील दहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळीपालन सुरु केले आहे.

व्यवसायातील बारकावे समजून त्यांनी मागील काही वर्षांत शेळीपालन व्यवसायात जम बसविला आहे. सध्या त्यांच्याकडे उस्मानाबादी, बीटल आणि आफ्रिकन बोअर जातीच्या पन्नास शेळ्या आहेत. शेळ्यांसाठी आधुनिक पद्धतीने ३० बाय ४० फूट आकाराचे दोन शेड उभारले आहेत. शेडमध्ये पिल्लांसाठी वेगळे कप्पे केले आहेत.

खाद्य व्यवस्थापन

खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

शेळ्यांच्या चाऱ्यासाठी वीस गुंठे क्षेत्रात मेथी घास, दहा गुंठ्यात दशरथ घास, दहा गुंठ्यात सुपर नेपिअर गवताची लागवड केली आहे.

शेळ्यांना मका, गहू, बाजरीचे भरडधान्य

व सरकी पेंढ असे मिश्रण करून दिले जाते.

व्यवस्थापनातील बाबी

शेडमधील कामांना सकाळी सहा वाजता सुरवात होते. सकाळी सहा ते सात या वेळात गोठा साफ करून पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरल्या जातात.

त्यानंतर सकाळी आठ वाजता शेळ्यांना खुराक दिला जातो. त्यात मका, गहू, बाजरीचे भरडधान्य व सरकी पेंढ असे मिश्रण दिले जाते. त्यानंतर अर्ध्या तासाने सुका चारा दिला जातो. यात तूर, सोयाबीन व हरभरा कुटार यांचा समावेश असतो. त्यानंतर दोन ते तीन तासानंतर शेळ्यांना हिरवा चारा दिला जातो. यात मेथी घास एक किलो, मका चारा कुट्टी एक किलो या प्रमाणात दिली जाते.

यानंतर शेळ्यांना दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत रानात मोकळे सोडले जाते. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.

सायंकाळी सहा वाजता हिरवा चारा दिला जातो.

पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध केले जाते.

आरोग्य व्यवस्थापन

शेडमधील शेळ्यांना वर्षभर वेगवेगळे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे लहान-मोठ्या शेळ्या आजारास बळी पडण्याची प्रमाण कमी होते.

शेडमध्ये लसीकरणावर विशेष भर दिला जातो. मे महिन्यात पीपीआर, जुलैमध्ये एफएमडीचे लसीकरण केले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT