Goat Farming : अभ्यासपूर्ण शेळीपालनात रमला मराठा बटालियन योद्धा

Goat Rearing : सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब येथील राजेंद्र लक्ष्मण गायकवाड यांनी १७ वर्षे मराठा बटालियनद्वारे देशात विविध ठिकाणी सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालन सुरू केले.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Sangamneri Goat Rearing : सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब येथील राजेंद्र लक्ष्मण गायकवाड यांनी १७ वर्षे मराठा बटालियनद्वारे देशात विविध ठिकाणी सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालन सुरू केले. सखोल अभ्यास, प्रयोगातून केलेले काटेकोर व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, सोशल मीडियाच विपणनासाठी वापर याद्वारे पाच वर्षांत या व्यवसायात त्यांनी चांगले यश व स्थिरता मिळवली आहे.

सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब (ता. सातारा) हे सैनिक पंरपरा असलेले गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात सैनिकांची संख्या आहे. गावातील राजेंद्र लक्ष्मण गायकवाड देखील २००१ मध्ये मराठा बटालियनच्य माध्यमातून लष्करात सैनिक म्हणून भरती झाले. कारगिल, राजस्थान, जम्मू काश्मीर, दिल्ली येथे सुमारे १७ वर्षे देशसेवा केली.

घरची चार एकर शेती, वडीलही शरीराने थकत चालले होते व पाच बहिणी अशी मोठी जबाबदारी पुढ्यात होती. त्यामुळे २०१८ मध्ये राजेंद्र यांनी लष्करातून सेवानिवृत्ती घ्यावी लागली. दोन वर्षे आधीपासूनच त्यांचे हे नियोजन सरू होते. त्यादृष्टीने शेती व त्याला पूरक शेळीपालन व शेड विकसित करण्यास सुरवात केली होती.

Goat Farming
Goat Farming : परदेशातील नोकरी सोडून गावी अभ्यासपूर्ण शेळीपालन

शेळीपालनातील पहिला अनुभव

सेवानिवृत्तीनंतर लगेचच राजेंद्र यांनी शेळीपालनास सुरवात केली. लोणंद येथील बाजारातून १२ उस्मानाबादी शेळ्यांची खरेदी केली. त्यांचे संगोपन बंदीस्त पद्धतीत अनुकूल ठरत नसल्याचे लक्षात आले. शेळ्यांची वाढ, अपेक्षित दूध मिळत नव्हते.

वर्षभरातच त्यांची विक्री केली. त्यानंतर राजस्थानी सिरोही शेळ्यांचा प्रयोग केला. पिल्लांची दीड वर्षांत मिळणारी कमी संख्या, गाभण होण्यास उशीर आदी विविध समस्यांमुळे शेळ्याही विकून टाकल्या.

शेळ्यांचा अभ्यास

अखेर कोटा, बिटल, सानेन, अजमेर, आफ्रिकन बोअर, जमनापरी आदी जातींच्या शेळ्यांची खरेदी करून प्रयोगास सुरवात केली. आपल्या भागातील वातावरणात कोणती जात चांगली वाढते, टिकते, कोणाची प्रतिकार शक्ती अधिक आहे.

त्यांचे चारा- पाणी व्यवस्थापन आदी विविध बाबींचा अभ्यास केला. त्यातून आफ्रिकन बोअर शेळी सर्व कसोट्यांवर चांगली उतरत असल्याचे अनुभवास आले. त्यानुसार २०२० मध्ये फलटण येथील निंबकर फार्म येथून या जातीच्या चार शेळ्यांची खरेदी केली.

Goat Farming
Goat Rearing Difficulties: शेळीपालनात कोणत्या अडचणी येतात?

आफ्रिकन बोअरचे संगोपन ( व्यवस्थापनातील बाबी)

-सध्या आफ्रिकन बोअरचे संगोपन. टप्याटप्याने वाढ करीत आज लहान मोठ्या मिळून शेळ्यांची संख्या ३६.
-पूर्वी पैदाशीसाठी अन्यत्र घेऊन जावे लागत असल्याने गेल्यावर्षी उच्च किमतीचा बोकड घेतला.
-८० बाय १२ फूट आकाराचे शेड. त्यात गाभण शेळ्या, पैदाशीचा बोकड, पिल्ले असे स्वतंत्र विभाग.

‘राधाकृष्ण गोट फार्म’ असे नामकरण.
- नेपियर, कडवळ, शेवरी, तुती आदींची लागवड. सोयाबीनचा भुस्सा, ज्वारीचा कडबा अशी हंगामनिहाय त्या त्या वेळी साठवणूक. कर्नाटकातून वर्षाला सात टन तुरीचा भुस्सा मागविला जातो.
-कृष्णा नदी जवळ असल्याने पाण्याची कमतरता भासत नाही.

-पशुवैद्यक मल्हार डेमरे यांचे मार्गदर्शन असल्याने आरोग्य व लसीकरण या बाबी वेळेवर व काटेकोर सांभाळल्या जातात.
- फार्ममध्ये जुळ्यांचे प्रमाण अधिक. काही वेळा तिळेही मिळाले आहे
-वडील लक्ष्मण (वय वर्षे८४) यांचे मार्गदर्शन तर पत्नी विद्या यांची मोलाची साथ.

सोशल मीडियाद्वारे विपणन

राजेंद्र यांनी शेळ्यांच्या विक्रीसाठी यू ट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबूक व व्हॉटस ॲप अशा सोशल मीडियाच्या सर्व प्रकारांद्वारे विपणन केले आहे. शेळीपालकांच्या ग्रूपवरही माहिती ते शेअर करतात. शेळ्यांचे व्हिडिओ तयार करून ते ‘अपलोड’ केले जातात. या सर्व प्रयत्नांमधून ‘मार्केट’ मिळवणे सोपे झाले आहे. शेळी सरासरी २५ किलो वजनाची झाल्यानंतर विक्री केली जाते.

बोकडाला १७ ते २० हजार, गाभण शेळीला ३५ ते ४० हजार रुपये असे दर मिळतात. सुमारे पंधरा शेळ्यांच्या
प्रति बॅचमधून सरासरी दोन ते सव्वा दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. जोडीला ऊसशेतीचे उत्पन्न पूरक ठरते. लेंडीखताचा वापर स्वतःच्या शेतात होतो. मागील वर्षी अतिरिक्त खताची
सहाहजार रुपये प्रति ट्रॉली दराने आठ ट्रॉली एवढ्या प्रमाणात विक्री केली.

आफ्रिकन बोअर जातीचा आलेला अनुभव

-रोग प्रतिकारक शक्ती चांगली.
-बंदिस्त पध्दतीच्या संगोपनाला अनुकूल.
- चारा सरसकट खात असल्याने वाया जात नाही.
-मटणाचे प्रमाण चांगले.
-वर्षभरात बोकडाचे वजन ७० ते ८० किलो तर शेळीचे ५० ते ६० किलोपर्यंत होते.


सुरवातीला पन्नास, शंभर शेळ्या अशा ‘लार्ज स्केल’ वर शेळीपालन सुरू करू नये.
त्यामुळे भांडवल विनाकारण अधिक गुंतवले जाते. खर्च वाढतात. असे फार्म नुकसानीत गेल्याचे
आढळले आहेत. जातिवंत शेळ्या, त्याही कमी घेऊन कमीत कमी खर्चात व्यवसायाला सुरवात करावी. गुजराती, राजस्थानी लोकांप्रमाणे मराठी माणसाने व्यावसायिक वृत्ती ठेऊन काम करायला हवे.

राजेंद्र गायकवाड- ९३७०५९८२७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com