Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

MNS-Shivsena UBT Political Alliance : राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत काढलेल्या अध्यादेशामुळे हिंदीचे मराठीवर आक्रमण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav ThackerayAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : मराठी भाषेवर होणारे हिंदीचे आक्रमण हाणून पाडण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने भव्य संयुक्त मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यानेच राज्य सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

त्यामुळे मराठीसाठी झालेली ठाकरे बंधूंची एकजूट मुंबई महापालिका निवडणुकीतही दिसायला हवी. मुंबई आणि मराठीवर होणारे आक्रमण परतवण्यासाठी त्यांनी यापुढेही हातात हात घालून चालावे, अशी तळमळ तळागाळातील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे यांना एका मुलाखतीत राज-उद्धव एकत्र येण्याबाबत विचारले असता, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र येणे कठीण गोष्ट नाही, महाराष्ट्र खूप मोठा आहे, आमच्यातील वाद किरकोळ असल्याचे ठाकरे यांनी म्हटले होते.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray: उशिरा का होईना; पण शहाणपण आले: ठाकरे

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत काढलेल्या अध्यादेशामुळे हिंदीचे मराठीवर आक्रमण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मनसेच्या पुढाकाराने ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याचे ठरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते या मोर्चामध्ये एकत्र दिसणार होते, मात्र सरकारने नमते घेत हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray : 'शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत, हे सरकारनं पहावं...'; लातुरच्या प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात

त्यामुळे जून्याजाणत्या शिवसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू भविष्यातही राजकीय व्यासपीठावर एकत्र राहिल्यास मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला चांगले दिवस येतील, अशी भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

मराठी माणसासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेमध्ये वेळोवेळी पडलेल्या फुटीमुळे नेहमीच मराठी माणसाला दुःख झाले आहे, मात्र आता मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची बाब समाधानकारक असून, पालिका निवडणुकीतही हीच एकी कायम दिसायला हवी.
- बळीराम राणे, ज्येष्ठ शिवसैनिक
मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ही मोठी समाधानाची आणि मनाला दिलासा देणारी बाब आहे. हीच एकी राजकीय पटलावरही यावी, ही मराठी माणसाची आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आमची भावना आहे. त्यामुळे मराठी माणसाला बळ मिळणार असले आहे, मात्र राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.
- सूर्यकांत लाडे, ज्येष्ठ शिवसैनिक
मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यानेच राज्य सरकारला माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे भविष्यातही मराठीसाठी एकी कायम राहिल्यास मराठी माणसाला आणखी बळ मिळेल, मुंबईत मराठी माणसाचे वर्चस्व कायम राहील.
- नितीन डिचोलकर, ज्येष्ठ शिवसैनिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com