Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : कृषी पुरस्कारांच्या रकमांमध्ये भरीव वाढ

Award Price Money : शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये राज्य शासनाने भरीव वाढ केली आहे.

मनोज कापडे

Pune News : शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये राज्य शासनाने भरीव वाढ केली आहे. त्यामुळे आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारार्थीला तब्बल तीन लाखापर्यंत रक्कम मिळू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषिरत्न पुरस्काराची रक्कम आधी केवळ ७५ हजार रुपये होती. वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण आणि सेंद्रिय शेतीमधील कृषिभूषण व उद्यानपंडित या पुरस्कारांची आधीची रक्कम ५० हजारांवरून आता दोन लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र व युवा शेतकरी पुरस्काराची रक्कम आता ३० हजारांऐवजी १.२० लाख रुपयांपर्यंत दिली जाणार आहे.

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना दिले जातात. त्यासाठी केवळ ११ हजार रुपये दिले जात होते. आता ही रक्कम ४४ हजार रुपये राहील. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार व उत्कृष्ट कृषिशास्त्रज्ञ पुरस्काराच्या स्वरूपात तूर्त कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी या पुरस्कारार्थींना प्रत्येकी १५ हजार रुपयेदेखील देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

पाचपटऐवजी चौपट वाढ

“शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये सरकारकडून लवकरच पाचपट वाढ करू,” अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यानंतर कृषी आयुक्तालयाकडून पाचपट रक्कमवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. मात्र, त्यात किंचित कपात करीत शासनाने पुरस्कारांच्या रकमा चौपटीने वाढविल्या, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्र्यांचा पुढाकार

यंदा हा पुरस्कार सोहळा मुंबईत करण्यात येणार असल्याचे समजते. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या पुरस्कार सोहळ्यापूर्वी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकदाच शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या फाईलवर सही घेण्यात त्यांना यश आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT