Alibag ZP Budget Agrowon
ॲग्रो विशेष

Alibag ZP Budget : कृषी क्षेत्राला बूस्‍टर

आगामी वर्षासाठी आर्थिक तरतूद करताना ७७ कोटी ७८ लाख ७९ हजार रुपये एकूण खर्च दाखवण्यात आला आहे.

Team Agrowon

Alibag News : जिल्‍हा परिषदेच्या अर्थसंकल्पात (Zilhaa Parishad Budget) कृषी क्षेत्रासाठी यंदा १७ कोटी ७० लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शेगवा लागवड, पांढऱ्या कांद्याची लागवड, शेततळे खोदण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आल्‍याने कृषी क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत रायगड जिल्हा परिषदेने आर्थिक वर्षासाठी ७९ कोटी २० लाख ९४ हजार ५०० रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी सायंकाळी सादर केला. मागील अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्‍या अर्थसंकल्पात १२ कोटी ४५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आगामी वर्षासाठी आर्थिक तरतूद करताना ७७ कोटी ७८ लाख ७९ हजार रुपये एकूण खर्च दाखवण्यात आला आहे.

यात मागील वर्षाच्या १ कोटी ४२ लाख १५ हजार रुपयांच्या शिलकीसह ७९ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या दालनात मुख्य लेखाधिकारी भगवान घाडगे यांनी सादर केला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे आदी उपस्थित होते.

जिल्‍हा परिषदेकडून यंदा शेवगा लागवडीला प्राधान्य देण्यात आले असून ग्रामीण भागात प्रत्‍येक कुटुंबाला दोन रोपे याप्रमाणे नऊ लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय कडधान्य, तृणधान्य लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्राेत्‍साहित केले जात आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी

शिक्षण

६ कोटी ७१ लाख

इमारती व दळणवळण

१७ कोटी ७८ लाख

पाटबंधारे

१ कोटी २७ लाख,

सार्वजनिक आरोग्य

१ कोटी ९१ लाख

नागरी सोयी-सुविधा

१३ कोटी १५ लाख

कृषी

१७ कोटी ७० लाख

पशुसंवर्धन

२ कोटी ७३ लाख

समाजकल्याण

१२ कोटी,

अपंगकल्याण

३ कोटी

महिला व बालकल्याण

७ कोटी

जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीची इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करून देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.
डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health: शाश्वत माती अन् शेती व्यवस्थापन

Indian Economy: अन्वयार्थ रुपयाच्या घसरगुंडीचा!

Junnar Gold Mango: ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याला ‘शेतकरी वाण’ म्हणून मान्यता

Jowar Sowing: ज्वारीचा आतापर्यंत साडेनऊ लाख हेक्टरवर पेरा

Cotton Procurement: ‘सीसीआय’ वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा

SCROLL FOR NEXT