Nandurbar ZP : काँग्रेसच्या सदस्यांचे नंदुरबार जि. प. सभेतून वॉकआऊट

तब्बल दीड तास वेळेपेक्षा उशीर होऊनही सभागृहात सभेसाठी अध्यक्षांसह इतर पदाधिकारीही उपस्थित राहिले नाहीत. सर्व विभाग प्रमुख अधिकारीही वेळेवर उपस्थित होते.
Nandurbar ZP
Nandurbar ZPAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक सभा निर्धारित वेळेपेक्षा दीड-दोन तास उशिरा सुरू होते. हा प्रकार नेहमीचाच असून यामुळे अतिदुर्गम भागातून आलेल्या सदस्यांना ताटकळत थांबावे लागते.

याबाबत संताप व्यक्त करीत काँग्रेसच्या सदस्यांनी आजच्या स्थायी समितीच्या सभेतून वॉकऑऊट करीत सभात्याग केला. त्यामुळे सभेत केवळ सत्ताधारी भाजप व त्यांचे मित्र पक्षाचेचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आज दुपारी दोनला निर्धारित वेळेत आयोजित केली होती. मात्र सव्वातीन वाजून गेले. सत्ताधारी व विरोधी गटाचे सदस्य मात्र दोनपासून वेळेवर उपस्थित राहून सभागृहात बसले होते.

तब्बल दीड तास वेळेपेक्षा उशीर होऊनही सभागृहात सभेसाठी अध्यक्षांसह इतर पदाधिकारीही उपस्थित राहिले नाहीत. सर्व विभाग प्रमुख अधिकारीही वेळेवर उपस्थित होते.

Nandurbar ZP
Nandurbar ZP : एकोणतीस कोटी शिलकीचे अंदाजपत्रक सादर

तरीही सभेला विलंब झाला. हा प्रकार केवळ आजपुरताच नव्हे तर यापूर्वी झालेल्या स्थायी समिती, सर्वसधारण सभा, अर्थ संकल्पची विशेष सभा आदी अनेकदा झाला.

त्यामुळे काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, सभागृहातील विरोध पक्ष नेता रतन पाडवी, राया मावची, दीपक नाईक आदींसह विरोधी गटाचा सदस्यांनी संताप व्यक्त केला.

वीस मिनिटात सभा संपली

सव्वातीनला जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व अन्य पदाधिकारी सभागृहात दाखल झाले. त्यानंतर उपस्थित सदस्यांचा उपस्थितीत सभा सुरू केली. यावेळी विविध विभागाचा आढावा घेण्यात आला.

त्यात शिक्षक बदली करताना कोणावरही अन्याय होऊ नये, असा मुद्दा उपस्थित करीत बदलीपात्र शिक्षकांना योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी सदस्य भरत गावित यांनी केली. यावर अध्यक्षा डॉ. गावित यांनी कोणावरही अन्याय न होता निकषानुसार बदली प्रक्रिया पारदर्शी पार पाडली जाईल, अशी ग्वाही दिली.

Nandurbar ZP
Goat Farming : शेतकरी नियोजनः शेळीपालन
अतिदुर्गम भागातून येणारा सदस्याला वेळेवर सभेस उपस्थित राहता यावे म्हणून सकाळी लवकर निघावे लागते. सभा दरवेळेस उशिरा सुरू होते. त्यामुळे लांबच्या सदस्यांना घरी पोचायला रात्री उशीर होतो. आजही तसेच घडले.
रतन पाडवी, काँग्रेस गटनेते, जि. प.नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com