Lampy Skin Agrowon
ॲग्रो विशेष

Lampi Virus : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना यापुढेही अनुदान देणार ; पशुसंवर्धनमंत्री विखे पाटील

Lumpy Skin Disease: लम्पीमुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना यापुढेही अनुदान देण्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Radhakrishna Vikhe Patil : ‘लम्पी स्कीन’ या चर्मरोगामुळे मृत जनावरांच्या मालकांना याआधी जसे अनुदान दिले जात होते. त्याप्रमाणे यापुढेही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लम्पी स्कीनच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी लम्पी स्कीन चर्मरोगाच्या पार्श्‍वभूमीवर लातूर जिल्ह्यातील ५७१ पैकी १५८ पशुपालकांना अद्याप मदत दिली नसल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. अधिवेशन संपण्यापूर्वी मृत जनावरांच्या मालकांना मदत दिली जाईल, असे आश्वासन मंत्री विखे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य ‘एनडीआरएफ’च्या नियमाप्रमाणे मदत करत आहे. लम्पी स्कीनमुळे मृत जानवारांच्या मालकांना मदत करणारे हे देशातील एकमेव राज्य आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारशी सामंजस्य करार केला आहे. लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅब सुरू होत आहे. ही लॅब सुरू झाल्यानंतर राज्याबरोबरच देशाला १०० टक्के लस राज्य सरकार पुरवठा करेल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी जनावरांच्या ठराविक संख्येमागे किती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे आणि सध्या वस्तुस्थिती काय आहे, असा प्रश्न विचारला. यावर डोंगरी भागात तीन हजार पशुधनामागे एक आणि बिगरडोंगरी भागात पाच हजार जनावरांमागे एक अशी संख्या आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने नव्या भरतीनंतर हा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही विखे म्हणाले.

गोंधळात संपला प्रश्नोत्तराचा तास

‘लम्पी स्कीन’वरील चर्चा सुरू असताना प्रश्नोत्तराचा तास संपत आला होता. वारंवार हात वर करूनही बोलण्याची संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या भास्कर जाधव यांनी गोंधळ घालत अध्यक्षांचा निषेध केला. मात्र, त्यांचा माईक सुरू नसल्याने त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवर घेण्यात आले नाही. यावर फडणवीस यांनी असा हेत्वारोप करणे बरोबर नाही, असे योग्य नाही. आपण सीनियर आाहात हे बरोबर नाही, असे सुनावले. या गोंधळात प्रश्नोतराचा तास संपला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: वाणगावात सूर्यफुलाची शेती बहरली

Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक

Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव

Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प

Women Empowerment: औसा तालुक्यातील चाळीस गावात महिला अस्मिता भवन

SCROLL FOR NEXT