Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : मोठी घोषणा! राज्य सरकार गायीच्या दुधास प्रतिलिटर ५ रुपये देणार अनुदान

Cow Milk Subsidy : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली.

sandeep Shirguppe

Maharashtra Cow Milk : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभेत केली. हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, त्यासाठी फेंट, एसएनफची मर्यादा ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर द्यावा, असे आदेश दिले होते. मात्र, काही दूध संघांचे दर २७ ते २८ रुपयांपर्यंत खाली आणले होते. यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादी कनिसचे जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारने प्रतिलिटर अनुदान जाहीर करावे, अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती.यावर उत्तर देताना पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री विखे-पाटील यांनी दूध संघांनी ३४ रुपये दर देणे बंधनकारकच आहे.

त्याशिवाय अनुदानासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी विधानसभेत विखे-पाटील यांनी निवेदन केले. 'आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ' आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असेही विखे- पाटील म्हणाले.

दुग्ध विभागाकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, याकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ (SNF) करिता प्रति लिटर किमान २९ रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित ( ऑनलाइन पद्धतीने ) अदा करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील.

डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील. ही योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहील.

त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त (दुग्ध व्यवसाय विकास) यांच्या मार्फत राबविली जाईल. यासंदर्भात शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असेही त्यांनी या निवेदनात सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT