PM Agricultural Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Subsidy : ठिबक, तुषार संचाचे १६ कोटींवर अनुदान प्रलंबित

PM Agricultural Irrigation Scheme : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील (पीएमएसकेवाय) सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक व तुषार संच अनुदानासाठी अर्ज केलेल्यांपैकी ९०२ लाभार्थी शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ९८ हजार १० रुपये अनुदानवाटप करण्यात आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील (पीएमएसकेवाय) सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक व तुषार संच अनुदानासाठी अर्ज केलेल्यांपैकी ९०२ लाभार्थी शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ९८ हजार १० रुपये अनुदानवाटप करण्यात आले आहे. अद्याप ५ हजार ८०० शेतकऱ्यांचे १६ कोटी २१ लाख ६४ हजार ४८९ रुपयांचे अनुदान प्रलंबित असून त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु अनेक महिन्यांपासून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पर ड्रॉप मोअर क्रॉप) सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक व तुषार संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आलेल्या अर्जातून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. या अंतर्गत २०२३-२४ या वर्षी अनुदानासाठी सोडत काढून जिल्ह्यातील २० हजार ५२८ शेतकऱ्यांच्या अर्जांची निवड करण्यात आली होती.

अर्जाच्या पडताळणीनंतर ६ हजार ९६६ अर्ज अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत आहेत. पूर्वसंमती दिलेल्या अर्जांची संख्या ६ हजार ९६० असून त्यापैकी ६ हजार ९४८ शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार संच खरेदी बाबतची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली आहेत. त्यापैकी ६ हजार ७५० शेतकऱ्यांच्या अर्जांच्या पडताळणीनंतर मोजमाप पुस्तिका पू्र्ण करून त्यांना अनुदान वितरित करण्यास संमती देण्यात आली आहे.

एकूण २८ शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा तपशिल चुकीचा असल्यामुळे अनुदान वितरणास अडचण येत आहे. २०२३-२४ मध्ये आजवर ९०२ शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ९८ हजार १० रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. २०२२-२३ मध्ये ६ हजार ९२९ शेतकऱ्यांना १२ कोटी २९ लाख २६ हजार २३४ रुपये व २०२१-२२ मध्ये ८ हजार ४८६ शेतकऱ्यांना १५ कोटी १४ लाख ९७ हजार ६५६ रुपये असे ३ वर्षांमध्ये एकूण १६ हजार ३१७ शेतकऱ्यांना २९ कोटी १३ लाख २१ हजार ९०० रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पीएमएसकेवाय सूक्ष्म सिंचन अनुदान निधी मागणी स्थिती (रक्कम कोटी रुपये)

तालुका आवश्यक निधी

परभणी २.८३

जिंतूर १.९०

सेलू १.९१

मानवत ३.०९

पाथरी ३.०८

सोनपेठ ०.५३

गंगाखेड ०.६५

पालम ०.८१

पूर्णा १.३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT