Ganesh Cooperative Milk Society Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : गणेश सहकारी दूध संस्थेच्या सर्व गवळ्यांना अनुदान वितरित

Subsidy Update : शासनाने मंजूर केलेले शेतकरी दूध प्रति लिटर ५ रुपये अनुदान राजुरी डेअरीच्या १०० टक्के गवळ्यांना देण्यात संस्थेला यश आलेले आहे, अशी माहिती अध्यक्ष हाडवळे यांनी दिली.

Team Agrowon

Junnar News : पुणे जिल्ह्यातील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या, राजुरी (ता. जुन्नर) या संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शासनाने मंजूर केलेले शेतकरी दूध प्रति लिटर ५ रुपये अनुदान राजुरी डेअरीच्या १०० टक्के गवळ्यांना देण्यात संस्थेला यश आलेले आहे, अशी माहिती अध्यक्ष हाडवळे यांनी दिली.

या वेळी विषयपत्रिकेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे. या वेळी माजी पंचायत समिती सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, संस्था उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे, माजी अध्यक्ष गोपाळा औटी, सुभाष पा. औटी, सोपान कदम, अनंतराव गटकळ, संस्था संचालक मंडळ,

ग्राहक पंचायत अध्यक्ष बाळासाहेब औटी, शरदचंद्र पतसंस्था अध्यक्ष एम. डी. घंगाळे, जी. के. औटी, विघ्नहर कारखाना संचालक पप्पू हाडवळे, वल्लभ शेळके, अविनाश पा. औटी, एकनाथ शिंदे, मुरलीधर औटी, नीलेश हाडवळे, गोरक्ष हाडवळे, संस्था सभासद, सचिव, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रो विशेष

तसेच चालू अहवाल वर्षात शिवाजी रामभाऊ औटी, किशोर बबन औटी, सुधीर लक्ष्मण डुंबरे, दत्तात्रय लक्ष्मण डुंबरे, मच्छिंद्र भीमाजी गोफणे या दूध गवळ्यांनी सर्वांत जास्त गाय दूध पुरवठा केला असून किरण नाथाजी डुंबरे, रंजना निवृत्ती औटी, सुवर्णा शिवाजी औटी, शिला दीपक हाडवळे, तृप्ती प्रावील आवटे या दूध गवळ्यांनी सर्वात जास्त म्हैस दूध पुरवठा केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

SCROLL FOR NEXT