Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा

Milk Producer : दूध उत्पादकांना राज्य सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचे घोषित केले होते.

Team Agrowon

Baramati News : ‘‘दूध उत्पादकांना राज्य सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर हे अनुदान जमा झाले आहे,’’ अशी माहिती बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी दिली.

बारामती तालुका दूध संघाचे प्रशासन २६४ प्राथमिक दूध संस्थांमार्फत प्रतिदिन २ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन करते. संघाने शासनाच्या अनुदान योजनेत लक्षवेधी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार गुरुवारी (ता. ७ ) ७० प्राथमिक दूध संस्थांच्या आधिपत्याखालील अडीच हजार दूध उत्पादकांच्या ६ लाख ८० हजार ७९४ लिटर दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात आले.

३४ लाख २ हजार ५२० रुपये इतकी एकूण अनुदानाची रक्कम संबंधित पात्र दूध उत्पादकांच्या बॅंक खात्यावर जमा झाली, असे गावडे यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष संतोष शिंदे उपस्थित होते.

दूध उत्पादकांना अनुदान मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंडे आदींनी योगदान दिले, असेही गावडे म्हणाले.

‘‘अनुदान वितरण प्रक्रियेत संघातील उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) संजय भोसले, संगणक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगली मेहनत घेतली. उर्वरित प्राथमिक दूध संस्था व त्यांच्या उत्पादकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या विहित नमुन्यातील दुधाची माहिती लवकर देत संघाला सहकार्य करावे,’’ असे आवाहन संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन ढोपे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT