ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा

Unseasonal Rain Crop Damage : नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

Team Agrowon

Jalna News : नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळपिकांसह कापूस, ज्वारी, हरभरा यासह इतरही पिकांचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. ३०) मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपस्थित होते.

पालकमंत्री सावे म्हणाले, की मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सरसकट सर्वच शेतपिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करावा.

अधिवेशनापूर्वी यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु. पीकविमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या प्रलंबित पीकविम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्याचे आदेश या वेळी पालकमंत्री सावे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT